शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कचरा व्यवस्थापन मंत्रलयास न्याय देईन, मायकल लोबो यांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 21:03 IST

घन कचरा व्यवस्थापन खाते तथा मंत्रलय जर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्थापन केले तर आपण त्या खात्याला न्याय देईन, असे मंत्रीपदाची शपथ स्वीकारलेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले.

पणजी - घन कचरा व्यवस्थापन खाते तथा मंत्रलय जर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्थापन केले तर आपण त्या खात्याला न्याय देईन, असे मंत्रीपदाची शपथ स्वीकारलेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले.कळंगुट- साळगावच्या पठारावर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा रहावा म्हणून लोबो यांनी यापूर्वी मोठे योगदान दिले आहे. मनोहर र्पीकर मुख्यमंत्रीपदी असताना र्पीकर यांनी लोबो यांना सोबत घेऊन तो प्रकल्प उभा केला. लोबो म्हणाले, की आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. बायंगिणीलाही आपण कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करून दाखवीन. गोव्याच्या अन्य भागांतीलही कचरा प्रश्न आपण सोडवीन. मात्र त्यासाठी आपल्याकडे घन कचरा व्यवस्थापन खाते मुख्यमंत्र्यांनी द्यावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी अशा खात्याची स्थापना करावी. खाते स्थापन करणो शक्य आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याशी चर्चा केल्यानंतर कायदेशीर सल्लामसलतरही सुरू केली आहे. लोबो म्हणाले, की कळंगुट मतदारसंघातील कचराप्रश्न आपण सोडवला. आम्ही कचरा व्यवस्थापन महामंडळाचे काम पाहिले आहे. आम्ही त्या कामात सहभागी झालेलो आहोत. किनारपट्टीतील कचरा गोळा करून तो कळंगुटच्या प्रकल्पात आणला जातो. कचरा समस्या ही राज्यभर खूप मोठी आहे. या समस्येवर कायमस्वरुपी उपाय मी काढीन. त्यासाठी कचरा व्यवस्थापन खाते मुख्यमंत्र्यांनी स्थापन करावे व ते आपल्याकडे सोपवावे. ते विधान अशोभनीय विजय सरदेसाई यांनी केलेल्या टीकेला लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री सावंत यांना गोंयकारपण हा शब्द देखील उच्चरता येत नाही असे सरदेसाई यांनी म्हणणो हे अत्यंत गैर आहे. सरदेसाई यांची विधाने म्हणजे दादागिरीची भाषा आहे. त्यांना मंत्रीपद का गमवावे लागले याबाबत त्यांनी अंतमरुख होऊन विचार करावा. सरदेसाई यांनी स्वत:ला वॉचडॉग म्हणून घेऊ नये. त्यांना तो नैतिक अधिकारही नाही. र्पीकर यांच्या समाधीस्थळाचा सरदेसाई यांनी दुरुपयोग केला आहे. राजकीय कारणास्तव दुरुपयोग केला. मुख्यमंत्री सावंत यांना गोव्याविषयी प्रेम आहे व विद्यमान सरकार हे गोंयकारपण राखणारे सरकार आहे, असे लोबो म्हणाले.

टॅग्स :goaगोवा