शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा रेती उपसा प्रकरण : नदीतून गस्ती का नाहीत? खंडपीठाचे खाण खात्यावर ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 22:21 IST

बेकायदेशीर  रेती उपसा रोखण्यासाठी खाण खात्याचे भरारी पथक निष्प्रभ ठरल्याने तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाकडून खाण खात्यावर कठोर ताशेरे ओढले आहेत.

 पणजी - बेकायदेशीर  रेती उपसा रोखण्यासाठी खाण खात्याचे भरारी पथक निष्प्रभ ठरल्याने तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाकडून खाण खात्यावर कठोर ताशेरे ओढले आहेत. अंमलबजावणीच्या बाबतीत मंगळवारपर्यंत खात्याने काय केले याची माहिती बुधवारपर्यंत न्यायालयात देण्याचा आदेश देण्यात आला आहे. 

तेरेखोल नदीसह गोव्यात इतर ठिकाणी चाललेल्या बेकायदेशीर रेती उपसा रोखण्याची मागणी  रेन्बो वॉरीयर्स व इतरांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती एम एन जामदार व पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. बेकायदेशीर उपसा रोखण्यासाठी खाण खात्याचे भरारीपथक निष्प्रभ ठरल्याचे याचिकादाराच्या वकिलाकडून न्यायालयात सांगण्यात आले. या बाबतीत खंडपीठाने  भरारी पथकाच्या स्थापनेविषयी विचारले तेव्हा पेडणे बार्देश, तीसवाडी, सत्तरी आणि फोंडा या तालुक्यात भरारी पथके करण्यात आल्याचे सरकारी वकिलाने सांगितले.  कामाची माहिती विचारली तेव्हा अद्याप नदीतून पाहाणी होत नाही असे आढळून आले. त्यामुळे खंडपीठाने खात्यावर तीव्र ताशेरे ओढले.  भरारी पथक केवळ रस्त्यावरून पाहाणी करते. रेती उपसा हा नदीत होतो. नदीतून गस्ती घालण्यासाठी भरारी पथकाकडे बोटी नाहीत अशी परिस्थिती असल्यामुळे भरारी पथके ही कमकुवत व अकार्यक्षम बनली आहेत. खंडपीठाने यामुळे तीव्र नापसंती व्यक्त केली. संध्याकाळी पुन्हा या प्रकरणात विशेष सुनावणी ठेवली व त्यावेळी खाण खात्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आले. कॅप्टन आॅफ पोर्ट आणि कोस्टगार्डकडे फ्लाईंग स्कवॉडसाठी गस्ती बोटी मागितल्याची माहिती खाण खात्यातर्फे संध्याकाळी न्यायालयात देण्यात आली. त्यावेळी बुधवारपर्यंत अंमलबजावणीसंबंधी अहवाल न्यायालयात देण्याचा आदेश खंडपीठाने दिला. 

भरारी पथके कराबेकायदेशीर रेती उपसा रोखण्यासाठी त्वरित अंमलबजावणी पथके किंवा भरारी पथकांची निर्मिती करण्याचा आदेश न् यायालयाने दिला. ज्या ठिकाणी अशी पथके अहेत ती सक्षम करा आणि ज्या ठिकाणी नाहीत तिथे नव्याने स्थापन करा असा आदेश देण्यात आला असा आदेश देण्यात आला. भरारी पथके स्थापन करण्याचा आदेश हा २०१३ मध्ये देण्यात आला होता.

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय