शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

सांस्कृतिक ग्रेस मार्क का नाहीत?

By admin | Updated: May 27, 2016 02:54 IST

पणजी : कला व सांस्कृतिक क्षेत्रात चमकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दहावी, बारावीच्या परीक्षेत ग्रेस मार्क दिले जावेत, अशी मागणी सर्व थरांतून होत आहे.

पणजी : कला व सांस्कृतिक क्षेत्रात चमकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दहावी, बारावीच्या परीक्षेत ग्रेस मार्क दिले जावेत, अशी मागणी सर्व थरांतून होत आहे. सरकारच्या सांस्कृतिक धोरणात तशी तरतूद असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. क्रीडा गुण दिले जातात, मग सांस्कृतिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांच्याच बाबतीत दुजाभाव का, असा सवाल केला जात आहे. माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनी याबाबत ट्विटरवर प्रतिक्रिया देताना सरकारने जलद कृती करून धोरणातील ग्रेस मार्कांची ही तरतूद अमलात आणावी, अशी मागणी केली आहे. क्रीडा गुणांप्रमाणेच सांस्कृतिक गुणही विद्यार्थ्यांना मिळायला हवेत, असे त्यांचे मत आहे. राज्य सांस्कृतिक सल्लागार समिती तसेच मनोरंजन संस्थेचे माजी सदस्य विशाल पै काकोडे म्हणाले की, कला व संस्कृती क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क न मिळणे हा त्यांच्यावर अन्याय आहे. क्रीडा क्षेत्राप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातही गोमंतकीय विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्य सांस्कृतिक धोरणातील या तरतुदीची अंमलबजावणी केल्यास बाल व युवा कलाकारांना त्यामुळे प्रेरणा मिळेल. कला क्षेत्रात नाव कमविण्यासाठी खूप मेहनत व कष्ट घ्यावे लागतात, तसेच वेळही द्यावा लागतो. गोवा राज्य सांस्कृतिक विकास समितीचे माजी उपाध्यक्ष श्रीधर कामत बांबोळकर यांनीही सांस्कृतिक क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे गुण मिळाले पाहिजेत, असे मत व्यक्त केले. नाट्य, चित्रकला, नृत्य, संगीत असे कोणतेही सांस्कृतिक क्षेत्र असो; विद्यार्थ्यांची कदर झाली पाहिजे. आज केवळ क्रीडा क्षेत्रात गुण दिले जात असल्याने सांस्कृतिक क्षेत्रातील विद्यार्थीही खेळांचे गुण मिळविणेच पसंत करतात. त्यांचे पालकच त्यांना गुणांसाठी क्रीडा क्षेत्राकडे पाठवतात, असे ते म्हणाले. माजी सभापती, सांस्कृतिक चळवळीतील नेते तथा निवृत्त मुख्याध्यापक तोमाझिन कार्दोझ यांनीही सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करताना निदान पुढील वर्षी तरी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक ग्रेस मार्क मिळावेत व त्यासाठी कला व संस्कृती खात्याने आतापासूनच पाठपुरावा करावा, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)