शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

खाणबंदी; विरियातोंनी केलेल्या आरोपांना अजून उत्तर का नाही? सुभाष फळदेसाईंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 2:26 PM

पत्रकार परिषदेत त्यांनी विरियातो यांची व्हायरल ॲाडिओ क्लीपही वाजवून दाखवली.

पणजी : खाणी बंद करण्यासाठी कट कारस्थानाबाबत इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी केलेल्या आरोपांना अजूनपर्यंत कोणीच का उत्तर दिलेले नाही? हे आरोप खरे मानावेत का?, असा प्रश्न समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी विरियातो यांची व्हायरल ॲाडिओ क्लीपही वाजवून दाखवली. फळदेसाई म्हणाले की, विरियातो यांनी अजून या क्लीपमधील आवाज आपला नाही, असे म्हटलेले नाही. कटकारस्थानासाठी ज्यांच्या घरी बैठक झाली असा आरोप केला आहे ते गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनीही अजून काही स्पष्टीकरण दिलेले नाही. कॉंग्रेसचे माजी मंत्री ज्योकीम आलेमांव यांच्याकडूनही खुलासा झालेला नाही. या ॲाडियो क्लीपमध्ये करण्यात आलेल्या आरोपानुसार त्यावेळी मंत्री ज्योकीम आलेमांव, विजय सरदेसाई यांनीच पर्यावरणप्रेमी क्लॉड आल्वारिस यांना त्यावेळी सुप्रिम कोर्टात जाण्यासाठी त्यांनीच पुढे काढले व खाणी बंदचा आदेश कोर्टाकडून आणला.’ प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठी गर्दी पाहून कॉंग्रेस भयभीत झाला आहे. 

मोदीजी गोव्याबद्दल काही बोलले नाहीत, या विरोधकांच्य टिकेचा समाचार घेताना ते म्हणाले कि,‘ झुवारीवरील नवीन पुलापासून मोपा विमानतळापर्यत सर्व गोष्टींचा उल्लेख मोदीजींनी केला. कोविड काळात पर्यटनस्थळ म्हणून गोव्याला प्राधान्यक्रमे लस उपलब्ध केली. कॉग्रेसची दुटप्पी भूमिकाही त्यांनी उघडी पाडली. महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती बांदोडकर यांनी मोदीजींच्या सभेला लोकांनी आपणहून मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सभा यशस्वी केली. जनतेने मोदींप्रती विश्वास दाखवल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :goaगोवा