शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा झाला नाही ते चांगलेच झाले असे तिचे वडील का म्हणाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 13:14 IST

प्रसिद्ध तबलापटू रिंपा सिवा आपल्या संगीतमय आयुष्यातील काही पाने उलगडली.

ठळक मुद्देप्रसिद्ध तबलापटू रिंपा सिवा आपल्या संगीतमय आयुष्यातील काही पाने उलगडली.निमित्त होते लोकमतच्या पणजी-गोव्यातील कार्यालयास सदिच्छा भेटीचे.  

सुरेश गुदलेपणजी, दि.18- मी वडिलांजवळ बसून असायचे. ते मुलांना तबला शिकवायचे, ते मी पाहायचे. तबल्यामध्ये मलाही इंटरेस्ट येऊ लागला. वडील प्रारंभी म्हणालेले, तू तर मुलगी आहेस, तु कशी तबला शिकणार? मुली तबला शिकत नाहीत. तेच वडील नंतर  म्हणाले, शिक. आणि मी तीन-चार वर्षाची असेन, तबला शिकू लागले. मुलगा झाला नाही म्हणून वडील खरे तर प्रारंभी दु:खी झालेले.  नंतर वडील म्हणाले, मुलगी झाली तेच चांगले झाले, मुलीने मला खूप काही दिले. मुलगा झाला नाही ते चांगलेच झाले. आणि या मनोगतावेळी ती दिलखुलास हसली. प्रसिद्ध तबलापटू रिंपा सिवा आपल्या संगीतमय आयुष्यातील काही पाने उलगडत होती. निमित्त होते लोकमतच्या पणजी-गोव्यातील कार्यालयास सदिच्छा भेटीचे.  

माझी प्रेरणा घेऊन खूप मुली तबला शिकत आहेत याचा आनंद मोठा आहे. तबल्याविषयीची मुलींच्या मनातील भीती दूर झालेली आहे, त्यामुळे खूप चांगले वाटते. रिंपा सिवा सांगत होती.  आता मुली मोठ्या संख्येने तबला वाजवत आहेत हा अनुभव सांगताना तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. आयुष्यात अजून खूप काही शिकायचे आहे, यांसारख्या वाक्या-वाक्यातून रिंपा यांची नम्रता जाणवत राहिली. तीन-चार वर्षाची असतानाचे आता जास्त आठवत नाही. मी वडिलांजवळ बसून असायचे, ते मुलांना तबला शिकवायचे. प्रारंभी मुलगी कशी तबला शिकणार म्हणणारे वडिलांचे मनोगत कालांतराने बदलले. मुलीने जे दिले ते मुलाने दिले नसते, अशी त्यांची भावना बनली. मुलीने जे दिले ते मुलाने दिले नसते असे ते बोलले, असे रिंपाने हसत-हसत सांगितले.