शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

म.गो.पक्ष का फोडता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2024 08:31 IST

ढवळीकर बंधूंना न विचारताच भाजपने बालाजी गावस यांना काल आपल्या बाजूने ओढले. 

भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत बलवान होतो तेव्हा तेव्हा तो मित्रपक्षांना हादरे देतो. हे महाराष्ट्रातही सिद्ध झाले आहे व अन्य राज्यांतही. काल म.गो.च्या एका प्रमुख सदस्याला भाजपने आपल्या पक्षात घेऊन मगोप नेतृत्वाला पहिला धक्का दिला. 

अर्थात, कालचा धक्का सौम्य असला तरी, मगो पक्षनेतृत्वाला त्यातून योग्य तो संदेश भाजपने पाठवला आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर गोव्यात मगो पक्षाचे काय होऊ शकते, त्याची ही झलक आहे असे राजकीय विश्लेषक मानतात. धारबांदोड्याचे सरपंच बालाजी गावस हे मगो पक्षाचे सक्रिय सदस्य होते. प्रमुख कार्यकर्ते होते. ते गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सावर्डे मतदारसंघात मगोपचे उमेदवार होते. मंत्री सुदिन ढवळीकर आणि मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी त्यांना गेल्या निवडणुकीवेळी बरेच प्रोत्साहन दिले होते. मात्र ढवळीकर बंधूंना न विचारताच भाजपने बालाजी गावस यांना काल आपल्या बाजूने ओढले. 

मगो पक्षाच्या नेतृत्वाला पूर्णपणे अंधारात ठेवून ही खेळी खेळण्यात आली आहे. यामुळे मगो पक्षाच्या केंद्रीय समितीला धक्का बसलाच, शिवाय मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकरही हादरले आहेत. भाजपने अशी खेळी का खेळली असावी, याचे उत्तर ते शोधत आहेत. भाजपचा आयात संस्कृतीवर प्रचंड विश्वास आहे. 

उमेदवारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना आयात करण्याचे धोरण देशभर सुरू आहे. गोव्याच्या भाजप केडरलाही आता या धोरणाची सवय झाली आहे. दक्षिण गोव्यात पल्लवी धेपे यांना तिकीट दिल्यापासून सगळी पालखी सदानंद तानावडे व मुख्यमंत्री सावंत यांनाच उचलावी लागत आहे. पल्लवी भाजपच्याच आहेत, कालपरवा आलेल्या नाहीत, असे लोकांना सांगताना भाजपचे नेते थकत नाहीत. बाबू कवळेकर, दामू नाईक, नरेंद्र सावईकर वगैरे पालखीमागील वारकऱ्यांच्या यात्रेत मुकाट्याने सहभागी झाले आहेत. दक्षिण गोव्यातील हिंदू बहुजन समाज सध्या निवडणुकीचे विविध अर्थ लावत आहे. म.गो. भाजपसोबत सत्तेत आहे. भाजपचा मित्रपक्ष असल्याने मगोपच्या नेतृत्वाला वाटले होते की- आपला पूर्वीचा उमेदवार यावेळी भाजप पळवणार नाही. मात्र तो समज काल खोटा ठरला, गावस यांनी गुडबाय केल्यानंतर मगोला आता बाकीचे प्रमुख सदस्य किंवा गेल्यावेळचे उमेदवार सांभाळून ठेवावे लागतील.

काँग्रेस किंवा आरजी किंवा अन्य विरोधी पक्षांमधील जर कुणाला भाजपने फोडले असते तर मगोपला चिंतेचे कारण नव्हते. मात्र बालाजींनाच भाजपने गळाला लावल्यानंतर मगोपची चिंता वाढली. वास्तविक मगोच्या समर्थकांची मते लोकसभा निवडणुकीवेळी भाजपलाच मिळणार आहेत. कारण सुदिन ढवळीकर यांनी मगो यावेळी दक्षिणेत ४५ हजार मते भाजपला देईल असे म्हटले होते. ढवळीकर यांनी गेल्याच आठवड्यात असे विधान केल्यानंतर भाजपने दोन पावले आणखी पुढे टाकली व आतापासूनच मगोपच्या सदस्यांना आपल्या काखोटीला मारण्याचे काम सुरू केले. मगो पक्षाचे आमदार जीत आरोलकर हेही मनाने पक्षासोबत नाहीत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना याची कल्पना आहेच. कदाचित लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जीत आरोलकर यांनाही भाजप आपल्या पक्षात तर घेणार नाही ना?

गेल्यावेळी बाबू आजगावकर व दीपक प्रभू पाऊसकर यांना भाजपने फोडले होते. माजी मंत्री दीपक पाऊसकर यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्याचा प्रस्ताव आहेच. दीपक पाऊसकर अपक्षच असल्याने ते भाजपमध्ये गेले तरी, त्यात मगोपचे नुकसान नाही. मात्र दीपकपूर्वीच बालाजी यांना भाजपने पावन करून घेतले. सावर्डे, कुडचडे किंवा फोंडा तालुक्यात अन्य जे कुणी मगोपचे खंदे सदस्य आहेत, त्यांनादेखील गळाला लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. डिचोलीचे नरेश सावळ यांनी अलीकडेच मगो पक्ष सोडला. भाजपला तूर्त सावळ नकोत, कारण डिचोलीत आमदार चंद्रकांत शेट्ये यांना डिस्टर्ब न करण्याचा भाजपचा विचार असावा, फोंड्याचे केतन भाटीकर यांनादेखील यापुढील काळात भाजपकडून पक्ष प्रवेशाची ऑफर दिली जाऊ शकते.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यात आणि देशातही अनेक छोट्या पक्षांच्या अस्तित्वाची कसोटी लागणार आहे, मगो पक्ष शिल्लक राहील की नाही, हे काळच ठरवील. 

टॅग्स :goaगोवाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४Politicsराजकारण