शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही फिरत राहिलात आम्ही सरकार बनवले, पर्रिकरांचा दिग्विजय सिंहांना टोला

By admin | Updated: March 31, 2017 18:46 IST

गोव्यात सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसला सरकार बनवता आले नाही.

ऑनलाइन लोकमत/सुरेश भटेवरा नवी दिल्ली, दि. 31 - ‘गोव्यात सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसला सरकार बनवता आले नाही. तुम्ही गोव्यात फिरत राहिलात आणि इकडे आम्ही सरकार बनवले’ हे उद्गार आहेत गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे. राज्यसभेत दिग्विजय सिंगांचे नाव न घेता (मात्र त्यांच्याकडे पाहत) पर्रिकर बोलत होते. गोव्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर शुक्रवारी शून्यप्रहरात अचानक पर्रिकर राज्यसभेत अवतरले आणि सभागृहात काही काळ घोषणाबाजी झाली.गोव्यात 22 आमदारांच्या पाठिंब्यावर 14 मार्च रोजी पर्रिकरांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तथापि राज्यसभेचा त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. माजी संरक्षण मंत्र्यांचे सभागृहात आगमन होताच, सभापतींच्या आसनासमोर काँग्रेस सदस्यांची घोषणाबाजी सुरू झाली. भाजपाने गैरमार्गाचा अवलंब करीत गोव्यात बहुमत मिळवले, असा आरोप काँग्रेस सदस्य करीत होते. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे सदस्यही मग आपापल्या जागेवर उठून म्हणाले, सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ तुमच्याकडे होते कुठे, तुम्ही तर पाठिंब्याचे केवळ आकडेच फुगवित बसला होता. दरम्यान, काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी पर्रिकरांना प्रश्न विचारला तेव्हाही सभागृहात गोंधळ सुरूच होता. उपसभापती कुरियन त्यांचा बचाव करीत म्हणाले, किमान पक्षी महिला सदस्यांचा तर सन्मान ठेवा. यानंतर पाटील यांनी रासायनिक खतांबाबतचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. पर्रिकर बोलायला उभे राहताच काँग्रेसचे राजीव गौडा, हुसेन दलवाई, रजनी पाटील यांनी व्हेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. पाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे प्रभारी दिग्विजयसिंग व बी. के. हरिप्रसादही पर्रिकरांच्या विरोधात घोषणा देऊ लागले. तेव्हा संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी मिश्कीलपणे म्हणाले, पर्रिकरांनी दिग्विजय सिंगांना यापूर्वीच ‘खास धन्यवाद’ दिले आहेत.गोव्यात काँग्रेसला 40 पैकी सर्वाधिक 17 तर भाजपाला 13 जागा मिळाल्या. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्डच्या प्रत्येकी 3 अशा 6 आमदारांनी, राष्ट्रवादीचे चर्चिल आलेमाव व अन्य २ आमदारांनी पर्रिकरांना पाठिंबा दिल्यामुळे २२ सदस्यांच्या बळावर गोव्यात भाजपने सरकार बनवले.