शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

तू गेल्यावर या वाटेने, चिमणीदेखील नच फिरके 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 01:39 IST

पुणे येथे कामानिमित्त गेलो असता, शिवाजीनगर परिसरात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक फलक पाहून मन भरून आले.

अजय बुवापणजी  : मराठी साहित्य विश्वात ‘आनंदयात्री’ कवी अशी ओळख निर्माण केलेल्या बाळकृष्ण भगवंत बोरकर, अर्थात बा. भ. बोरकर यांचा आज जन्मदिवस. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आज त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य सोहळ्यांचे आयोजन होत असेल. कोणे काळी ‘बाकीबाब’ म्हणत गोमंतकीयांनी त्यांना काळजाच्या कप्प्यात आदराचे स्थान दिले होते. परंतु, सरकार दरबारी बाकीबाबांविषयी एवढी उदासीनता का? बाकीबाबांचे जन्मस्थान असलेल्या बोरी गावात आज सरकारने साहित्य उत्सव आयोजित करायला हवा होता. ज्या घरात बाकीबाबांचा जन्म झाला घराकडची भग्नता पाहिल्यानंतर मन विषण्ण होते.

पुणे येथे कामानिमित्त गेलो असता, शिवाजीनगर परिसरात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक फलक पाहून मन भरून आले. ‘पद्मश्री बा. भ. बोरकर या घरात राहात होते’ असे तेथे एका परक्या माणसाने अभिमानाने लिहिलेले आहे. बाकीबाबांची एक फार जुनी कविता आहे.तू गेल्यावर या वाटेनेचिमणीदेखील नच फिरकेकसे अचानक झाले नकळेअवघे जग परके परके...प्रागतिक विचार मंच या संस्थेने काही वर्षांपूर्वी त्या घरावर एक फलक लावल्याने ये-जा करणाऱ्या लोकांना कळते की, त्या घरात बाकीबाब जन्माला आले होते. काही लोक आपसूकच मग त्या घराकडे पाहून हात जोडतात. परंतु, नतमस्तक झालेल्या लोकांना घर मात्र म्हणत असतं,मध्यरात्री नभ घुमटाखालीशांतिशिरी तम चवऱ्या ढाळीत्यात बहिष्कृत मी ज्या काळी एकांती डोळे भरती...दैवदत्त प्रतिभेचा आनंदानुभव ज्यांनी काव्यरसिकांना भरभरून दिला, त्या बाकीबाबांच्या स्मृतिस्थळासाठी गोव्याचे कला व संस्कृती खाते, पर्यटन खाते यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे, हीच आजच्या दिवशी बाकीबाबांना आदरांजली असेल.