शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकाच होत्या...! विद्यार्थ्यांना पाहून राष्ट्रपती आपला ताफा थांबवतात तेव्हा.. 

By आप्पा बुवा | Updated: August 24, 2023 13:46 IST

गुरुवारी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू ह्या कवळे येथील शांतादुर्गा मंदिराला भेट देण्यासाठी निघाल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : देशाचे राष्ट्रपती ज्या मार्गावरून जात असतात तिथे सुरक्षा संबंधी खडक उपाय योजना आखलेल्या असतात. चिटपाखरू सुद्धा ती यंत्रणा तोडून पुढे जाऊ शकत नाही. असे असतानाही जी वी एम महाविद्यालयाची मुले मात्र नशिबवान ठरली. साक्षात महामहीम राष्ट्रपती त्यांना पाहून थांबल्या व त्यांच्याशी हितगुज करून गेल्या.

 गुरुवारी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू ह्या कवळे येथील शांतादुर्गा मंदिराला भेट देण्यासाठी निघाल्या होत्या. बरोबर अकरा वाजता त्यांचा ताफा जी वी एम महाविद्यालयाच्या सर्कलकडे पोहोचताच अचानक त्यांचा ताफा थांबला. त्यांची गाडी थांबलेली पाहताच सुरक्षा यंत्रणेची अक्षरशः भांबेरी उडाली. मुळात त्या का थांबल्या हे कुणाच्याच लक्षात आले नाही. अचानक त्यांची गाडी थांबलेली पाहून विद्यार्थी सुद्धा अचंबित झाले. त्यांना सुद्धा कळेना की राष्ट्रपतींची गाडी का थांबली. खरे तर राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना लांबूनच पाहिले होते. विद्यार्थी  त्यांच्यासाठी हात उंचावत होते ते त्यांनी लांबूनच व्यवस्थित हेरले व विद्यार्थ्यांच्या जवळ येतात आपली गाडी थांबवली.

गाडीतून  उतरून त्या चक्क जिकडे विद्यार्थी व शिक्षक उभे होते तिथपर्यंत चालत गेल्या. त्यांच्याबरोबरच राज्यपाल श्रीधन पिल्ले व मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत हे सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये येऊन मिसळले . त्यांनी काही क्षण विद्यार्थ्यांशी हितगुज केले व काही विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप सुद्धा केले. साक्षात राष्ट्रपतींना आपल्यासमोर व आपल्या सोबत पाहून विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही . काही विद्यार्थ्यांनी सदरचे क्षण आपल्या मोबाईल मध्ये बंदिस्त सुद्धा केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या जवळ बोलावून घेतले.थोडक्यात त्या आल्या.. त्यानी पाहिले.. व त्या जिंकल्या असा काही माहोल त्यांनी त्या दहा मिनिटात तयार केला.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मू