शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

 प्रकल्पविरोधकांवर जेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री संतापतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 10:15 IST

पणजीपासून जवळच असलेल्या बायंगिणी गावात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यासाठी काही लोक तसेच पुरातन वारसाप्रेमी विरोध करत असल्याने आणि मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासही काही एनजीओ आक्षेप घेत असल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सथ्या प्रचंड संतापले आहेत. 

पणजी :  पणजीपासून जवळच असलेल्या बायंगिणी गावात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यासाठी काही लोक तसेच पुरातन वारसाप्रेमी विरोध करत असल्याने आणि मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासही काही एनजीओ आक्षेप घेत असल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सथ्या प्रचंड संतापले आहेत. 

काहीजण ऊगाच प्रकल्पांना विरोध करतात. बायंगिणी परिसरात हेरिटेज साईट आहे याची आम्हाला कल्पना आहे आणि हेरिटेज साईट म्हणजे काय तेही आम्हाला ठाऊक आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध करणारे हेरिटेज साईटच्याच जागेत राहतात आणि त्यांच्याकडून देखील रोज कचर्‍याची निर्मिती केली जाते. हेरिटेजविषयी एवढे प्रेम असेल तर या लोकांनी तिथे निवास करणे बंद करावे अशा शब्दांत मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्या मनातील  संतापाला वाट मोकळी करून दिली.

हेरिटेज साईटच्या क्षेत्रात पाचशे मिटरच्या परिघात राहणाऱ्यांनी जागा रिकामी करून दाखवावी. आपण तयार करणारा कचरा दुसर्‍यांच्या क्षेत्रात नेऊन त्यावर प्रक्रिया केली तर चालते पण आपल्या क्षेत्रात कचरा प्रक्रिया प्रकल्प नको ही काहीजणांची भूमिका चुकीची आहे असे मुख्यमंत्री नाराजीने पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

दाबोळी विमानतळाला मर्यादा आहेत हे आपण स्वत: सात वर्षांपूर्वी जाणले होते. त्यामुळेच नव्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाचा आग्रह सरकारने धरला तर काही घटक (व एनजीओ) मोपा विमानतळाला विरोध करू लागले. नौदलाच्या सरावामुळे दाबोळी विमानतळावर नागरी वाहतूक पूर्णपणे सुरू ठेवण्यावर मर्यादा येते. आता तिच समस्या निर्माण झाली आहे. मला सात वर्षांपूर्वी या समस्येची कल्पना आली होती. मी संरक्षण मंत्री असताना काही प्रमाणात तोडगाही काढला. जे लोक नवा विमानतळ बांधायला विरोध करतात त्यांना पर्यटन आणि नागरी उड्डाण याविषयी काही ठाऊक नाही असे मुख्यमंत्री काहीशा उद्वेगाने बोलले. आता दाबोळी विमानतळावर जो प्रश्न निर्माण झाला आहे त्याविषयी तुम्ही पत्रकारांनी मला विचारण्यापूर्वी त्या मोपा विरोधकांना विचारावे असा सल्ला मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आवाजाची पट्टी थोडी वाढवत दिला. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर