शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

‘वेलकम टू गोवा’... ओवाळून -फुलांचा हार घालून थाटात पर्यटकांचे केले स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 16:25 IST

मुरगाव बंदरात ६५० विदेशी पर्यटक आणि जहाजावरील ४६१ अधिकारी - कर्मचाºयांना घेऊन पर्यटक हंगामातील पहीले विदेशी जहाज झाले दाखल

वास्को: बुधवारी (दि.१६) सकाळी गोव्याच्या यंदाच्या पर्यटक हंगामातील ‘वायकींग मार्स’ नामक पहीले विदेशी क्रुज जहाज ६५० विदेशी पर्यटक आणि त्या जहाजावर काम करणाºया ४६१ अधिकारी - कर्मचारी मिळून ११११ जणांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल झाले. कोविड महामारीनंतर सुमारे अडीच वर्षाने मुरगाव बंदरात पहीले विदेशी क्रुज जहाज पर्यटकांना घेऊन दाखल झाल्यानंतर येथे त्यांचे ढोल - ताशंच्या तालावर, तसेच विदेशी पर्यटकांना ओवाळून आणि फुलांचा हार घालून त्यांचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले.

मुरगावात दाखल झालेल्या ह्या हंगामातील पहील्या विदेशी क्रुज जहाजावरील पर्यटकांच्या स्वागतासाठी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी स्व:ता उपस्थिती लावून त्यांनी त्यांचे स्वागत केले. यंदाच्या पर्यटक हंगामात गोव्यात विदेशी आणि राष्ट्रीय मिळून सुमारे ६५ क्रुज जहाजे पर्यटकांना घेऊन येणार असल्याची माहीती आमोणकर यांनी पत्रकारांना दिली.

यंदाच्या पर्यटक हंगामातील मुरगाव बंदरात दाखल झालेले हे पहीले विदेशी चार्टर नोरव्हे राष्ट्रातून निघाल्यानंतर ते दुबईला होऊन नंतर भारताच्या मुंबई बंदरात तीन दिवसापूर्वी दाखल झाले. बुधवारी सकाळी ते क्रुज जहाज गोव्याच्या मुरगाव बंदरात दाखल झाले असून बुधवारी सकाळी येथून ते सर्व विदेशी पर्यटकांना घेऊन कोलंबो जाण्यासाठी रवाना होणार असल्याची माहीती प्राप्त झाली. कोविड महामारीनंतर सुमारे अडीच वषार्नंतर विदेशी पर्यटकांना घेऊन पहीले क्रुज जहाज मुरगाव बंदरात दाखल होणार असल्याने गोव्यातील विविध पर्यटक व्यवसायांशी जुळलेल्या नागरिकांबरोबरच टॅक्सी, रिक्क्षा चालकही मोठे उत्साहीत असल्याचे दिसून आले.

बुधवारी सकाळी १० च्या सुमारास जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले. मात्र त्या जहाजावरून येणाºया विदेशी पर्यटकांच्या स्वागतासाठी ‘मुरगावचा राजा टॅक्सी युनियन’ संघटनेने बंदरातील क्रुज टर्मिनल बर्थच्या बाहेर उपस्थिती लावल्याचे दिसून आले. मुरगाव बंदरात दाखल होणाºया त्या विदेशी क्रुज जहाजावरील पर्यटकांच्या स्वागतासाठी येथे खास ढोल - ताशांच्या पथकाची व्यवस्था केली होती. जहाज बंदरात दाखल झाल्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर काही विदेशी पर्यटक येथे त्यांच्यासाठी उपलब्ध केलेल्या खासगी बसमधून तर काही विदेशी पर्यटक टॅक्सीमधून गोवा दर्शनासाठी निघून गेले. जहाजावरून उतरून क्रुज टर्मिनल बर्थच्या बाहेर आल्यानंतर विदेशी पर्यटकांचे ढोल - ताशांच्या तालावर तसेच त्यांना ओवाळून आणि फुलांचा हार घालून त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

‘वेलकम टू गोवा’ अशा शब्दात त्या विदेशी पर्यटकांना फुलांचा हार घालून त्यांचे स्वागत होत असल्याचे पाहून ते पर्यटकही मोठे आनंदीत झाले. मुरगाव बंदरात दाखल झालेल्या पहील्या विदेशी क्रुज जहाजावरून आलेले विदेशी पर्यटक विविध देशातील असून त्यापैंकी बहुतेक पर्यटक युरोप मधून असल्याची माहीती प्राप्त झाली. यंदाच्या पर्यटक हंगामात विदेशी आणि राष्ट्रीय मिळून सुमारे ६५ क्रुज जहाजे पर्यटकांना घेऊन गोव्यात येणार असल्याची माहीती प्राप्त झाली.स्वागतासाठी आमदारांनी लावली उपस्थिती

मुरगाव बंदरात दाखल झालेल्या पहील्या विदेशी क्रुज जहाजावरील विदेशी पर्यटकांच्या स्वागतासाठी आमदार संकल्प आमोणकर यांनी बुधवारी सकाळी उपस्थिती लावली. ह्या पर्यटक हंगामातील पहीले विदेशी क्रुज जहाज गोव्यात दाखल झाल्याने आजचा दिवस आनंदाचा असल्याचे आमोणकर म्हणाले. पुढच्या दिवसात गोव्यात राष्ट्रीय आणि विदेशी मिळून सुमारे ६५ क्रुज जहाजे पर्यटकांना घेऊन गोव्यात येणार असून यामुळे गोव्यातील विविध पर्यटन व्यवसायांना फायदा होणार असा विश्वास आमोणकर यांनी व्यक्त केला. एका महीन्यापूर्वी ह्या हंगामातील पहीले राष्ट्रीय क्रुज जहाज पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल झाले असून आज विदेशी क्रुज जहाजांची सुरवात झाल्याने विविध पर्यटक व्यवसायांबरोबरच येथील टॅक्सी व्यवसायिकांना याचा चांगला फायदा होणार.

कोरोना महामारीत संपूर्ण जगात सर्वकाही ठप्प झाले होते. त्यामुळे सर्वांबरोबरच गोव्यातीलही विविध व्यवसायिकांना मोठी नुकसानी सोसावी लागली होती. आता सर्वकाही ठीक होत असून यंदाच्या पर्यटक हंगामात गोव्यातील पर्यटक व्यवसायाशी जुळलेल्या सर्व व्यवसायिकांना उत्तम फायदा होणार असा विश्वास आमोणकर यांनी व्यक्त केला.जहाज काही दिवस थांबल्यास   ठरेल फायदेशीर: आमदार संकल्प आमोणकर

मुरगाव बंदरात दाखल होणारी देशी आणि विदेशी क्रुज जहाज सकाळी येऊन रात्री दुसºया ठीकाणी जाण्यासाठी निघून जाते. यामुळे येथील विदेशी - देशी पर्यटकांना थोडेच तास गोवा दर्शन करण्यासाठी मिळतात. मुरगाव बंदरात दाखल होणारी क्रुज जहाजे जर सुमारे दोन दिवस थांबल्यास पर्यटकांना गोव्याच्या दर्शनाचा उत्तम लाभ उठवण्यासाठी नक्कीच फायदा होणार. त्यातून गोव्याच्या विविध पर्यटन व्यवसायांना नक्कीच उत्तम फायदा होणार. गोव्यात येणारी क्रुज जहाजे काही दिवस मुरगाव बंदरात रहावी यासाठी लवकरच गोवा सरकार नक्कीच उचित पावले उचलणार असा विश्वास आमदार संकल्प आमोणकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन