काशिराम म्हांबरे, म्हापसा: कान्सा-थिवी येथे ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकी चालक सुजाता साळगांवकर ( वय २६, नास्नोळा बार्देश ) येथील युवतीचा या अपघातात दुर्दैवीरित्या अंत झाला.
कोलवाळ पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, घटना आज शनिवारी दुपारी दीडच्या दरम्यान घडली. चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने ती युवती चालवत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत युवती दुचाकीसह ट्रकच्या चाकाखाली येऊन काही अंतरापर्यंत फरफटत गेली. त्यातच तिचा दुर्दैवी अंत झाला. तातडीने त्या युवतीला उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.