शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दुबईत अटक झालेल्या गोमंतकीयाच्या सुटकेसाठी प्रयत्न करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 18:51 IST

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्पष्टीकरण 

पणजी -  दुबलईला अटक होऊन तेथील तुरुंगात पडलेल्या शिवोली येथील रायन डिसोझा या फुटबॉलपटूची सुटका व्हावी म्हणून आपण प्रयत्न करीन, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे विधानसभेत सांगितले. येत्या 6 किंवा 7 ऑगस्टला आपण दिल्लीत जाणार असू त्यावेळी केंद्रीय विदेश व्यवहार मंत्रालयापर्यंत आपण हा विषय पोहचवणार असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

प्रश्नोत्तराच्या तासावेळी थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी याबाबतचा प्रश्न मांडला होता. अन्य काँग्रेस आमदारांनीही हळर्णकर यांना साथ दिली. बार्देश एफसी संघासाठी डिसोझा याची निवड झाली होती. तो चांगला फुटबॉलपटू आहे. त्याचा काही दोष नसताना दुबईतील एका घोटाळेबाज कंपनीचा कर्मचारी म्हणून त्यास विमानतळावर अटक झाली. तो फक्त तीन महिनेच तिथे काम करत होता. त्याचा घोटाळ्य़ात समावेश नाही अशी त्याच्या कुटूंबियांची व शिवोलीतील लोकांचीही भावना आहे. सरकारने या विषयात गंभीरपणो लक्ष घालावे, केवळ एक ईमेल पाठवला म्हणून काम होणार नाही, असे हळर्णकर यांनी सांगितले. यापूर्वी खासदारांपर्यंत हा विषय नेण्यात आला होता, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घातले तरच रायन डिसोझाला दिलासा मिळू शकेल. रायनचे कुटूंब अडचणीत आहे, असे हळर्णकर म्हणाले. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनीही हळर्णकर यांचा मुद्दा उचलून धरला व सरकारने रायनला मदत करावी, तो निष्पाप आहे अशी शिवोलीतील सर्व लोकांची भावना आहे, असा मुद्दा मांडला. अजून या प्रश्नी गोवा सरकारने केंद्रीय विदेश व्यवहार मंत्रलयाशी देखील संपर्क साधलेला नाही हे स्पष्ट होत असल्याचे कवळेकर म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी दुबईमधील कायदे खूप कडक असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी हा विषय पंतप्रधानांकडे मांडला व पंतप्रधान जर दुबईच्या दुतावासाशी बोलले तरच रायनचा प्रश्न सुटेल. तो चांगला फुटबॉलपटू आहे, असे आलेमाव म्हणाले. आपण प्रयत्न करू शकतो, आपल्याला त्या तरुणाविषयी सहानुभूती आहे. त्याने जर कंपनीचा कर्मचारी म्हणून कुठे सही केली असेल तरी, त्याच्यावर आरोप येईलच. मी त्याच्या केसची गुणवत्ता ठरवू शकत नाही. गोव्यात देखील अनेकजण दोष नसताना तुरुंगात पडल्याची उदाहरणे आहेत. अडचणीत आलेली प्रत्येक व्यक्ती घोटाळेबाज असते असे काही नाही. मी विदेश व्यवहार मंत्रलयाकडे विषय मांडेन, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरFootballफुटबॉलDubaiदुबई