शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निलेश राणेंची गुंडगिरी खपवून घेणार नाही, गोव्याच्या मंत्र्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 11:55 IST

गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) आपत्कालीन स्थितीवेळी मोफत उपचार दिले जात आहेत. अन्य उपचारांवेळी 20 टक्के शुल्क आकारले जात आहे. या विषयावर काही तरी तोडगा काढण्याची गोवा सरकारची तयारी आहे, पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पुत्र निलेश राणे याची गुंडगिरी गोवा खपवून घेणार नाही, असा इशारा गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी बुधवारी येथे दिला.

पणजी : सिंधुदुर्गातील लोकांनाही गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) आपत्कालीन स्थितीवेळी मोफत उपचार दिले जात आहेत. अन्य उपचारांवेळी 20 टक्के शुल्क आकारले जात आहे. या विषयावर काही तरी तोडगा काढण्याची गोवा सरकारची तयारी आहे, पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पुत्र निलेश राणे याची गुंडगिरी गोवा खपवून घेणार नाही, असा इशारा गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी बुधवारी येथे दिला.

गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे सलग दोन दिवस निलेश राणे यांच्या इशा-यांविषयी बोलले. बुधवारी सकाळी गोमेकॉ इस्पितळात पत्रकारांशी बोलताना मंत्री विश्वजित राणे म्हणाले, की सिंधुदुर्गच नव्हे तर सर्वच ठिकाणच्या परप्रांतीयांना गोव्याच्या सरकारी इस्पितळात उपचारांसाठी थोडे शुल्क भरावे लागत आहे. गोव्यातील इस्पितळ हे गोमंतकीयांना मोफत सुविधा देण्यासाठी आहे. आम्हाला गोमंतकीयांचे हित अगोदर पहायचे आहे. मात्र आम्ही कुणालाच गोमेकॉ इस्पितळात उपचार नाकारलेले नाहीत. गोमेकॉमध्ये उपचार करून घेण्यासाठी कारवारपासून सिंधुदुर्गर्पयतचे लोक येतात. खनिज खाणी सुरू असतात तेव्हा ट्रकांवर चालक म्हणून बिहार वगैरे भागातील लोक काम करतात. ते देखील गोमेकॉत येऊन उपचार घेतात. जे एकदम गरीब असतात, त्यांना शुल्काच्या व्यवस्थेमधून वगळण्याची तरतुद आम्ही केली असून तसा अधिकार गोमेकॉ इस्पितळाच्या वरिष्ठ अधिका-यांना दिला आहे.

याचबरोबर विश्विजित राणे म्हणाले, की सिंधुदुर्गमधील कुणालाही वाहन अपघात झाला, की त्यास मग गोमेकॉत आणले जाते. तिथे त्याच्यावर तातडीने उपचार केले जातात. तो परप्रांतीय म्हणून दुर्लक्ष केले जात नाही. सिंधुदुर्गमधील लोकांनाही उपचारांसाठी थोडे शुल्क भरावेच लागेल. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नावर भेटणार आहे. शुल्क मागे घेतले जाणार नाही पण एखादा समझोता करार महाराष्ट्राशी करून उपाय काढता येईल. शेवटी गोवा व महाराष्ट्रातही भाजपचेच सरकार अधिकारावर आहे.

सिंधुदुर्गमध्ये राजकीय कारणास्तव काहीजण आंदोलनाची भाषा करत आहेत. गोवा बंद करू, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. गोवा राज्य म्हणजे निलेश राणे यांचे कळंगुटमधील हॉटेल नव्हे. गोवा ही त्यांची मालमत्ता नव्हे. गोव्यात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे.

टॅग्स :goaगोवा