शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीची पाणी पातळी घटली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 18:34 IST

फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीची पाणी पातळी घटली आहे. 

अजय बुवा

फोंडा : संपूर्ण तिसवाडी व फोंडा तालुक्याची तहान भागवणाऱ्या दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी कमालीची खाली आली असून, आठ दिवसाच्या आत13 पैकी तीन बंधारे  सोडण्यात आले आहेत. असे असतानाही पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. पाण्याची पातळी वाढली नाही तर संपूर्ण फोंडा तालुक्या बरोबरच तिसवाडी तालुक्याला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू शकते.

आमच्या प्रतिनिधीने ओपा येथील पाणी प्रक्रिया प्रकल्पाला भेट देऊन नदीची पाहणी केली असता  मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याची पातळी बरीच खाली आढळून आली. गेल्या दहा दिवसापासून कुळे परिसरातील दोन बंधारे खुले करण्यात आले होते. गुरुवारी आणखीन एक बंधारा खुला करण्यात आला आहे. पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी जलस्त्रोत तसेच बांधकाम खात्याचे अभियंते कसोशीने प्रयत्न करत आहेत. 

ओपा पाणी प्रक्रिया प्रकल्पा मध्ये चार मीटर पाणी असणे गरजेचे असते. सध्या या पाण्याची पातळी 2. 70 मीटर असून पाहण्या पाण्याची पातळी 2.40 मीटर पर्यंत आल्यानंतर फोंडा व तिसवाडी तालुक्यात मर्यादित पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी 2020 साली ओपा प्रकल्पाला पाण्याची अशीच समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी जलस्त्रोत खात्यातर्फे धारबांदोडा तालुक्यातील विविध खाणीचे पाणी दूधसागर नदीत सोडण्यात आले होते. जेणेकरून दूधसागर नदीची पातळी राखली जाईल. त्यावेळी सदर प्रयोग यशस्वी ठरला होता  यावेळी सुद्धा पाण्याची पातळी राखण्याकरता व दोन्ही महत्त्वाच्या तालुक्याला सुरळीत पाणीपुरवठा करण्याकरता खनिज खंदकातील पाणी पुन्हा एकदा दूधसागर नदीत सोडण्याची प्रक्रिया त्वरित हाती घ्यावी लागेल. या संदर्भात जलस्त्रोत खात्याचे अभियंते सुद्धा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे. अभियंताची प्रतिक्रिया:-दूधसागर नदीच्या पाण्याचे पातळी कमी होत आहे ही वस्तुस्थिती आहे. जलस्त्रोत खात्याने कुळे परिसरातील बंधारे सुद्धा खुले केले आहेत .पाण्याची पातळी अशीच जर खाली येत राहिल्यास  लोकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. यंदा पाऊस सुद्धा तुलनेने तसा कमीच पडला आहे. नागरिकांनी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. जयंत प्रभू, सहाय्यक अभियंता 

ओपा पाणी प्रक्रिया प्रकल्प, पाणी नेमके जाते कुठे फोंड्यात नदी,ओहोळ, नाल्यांची काही कमी नाही. धारबांदोडा तालुक्यात  नदीवर लहान एम एल डी चे पाणी प्रक्रिया प्रकल्प राबवून पाणीपुरवठा होत आहे. तीच पद्धत कुठेतरी फोंडा तालुक्यातील नदीवर सुद्धा राबवण्याची वेळ आलेली आहे. मुबलक पाणीसाठा असताना सुद्धा दूधसागर नदीच्या पात्रात मात्र का कमी पाणी मिळते याची शहनशा व्हायला हवी. पूर्वीसारखे सगळे नाले व ओहोळ नदीला मिळाले तर दूधसागर नदीचे पाणी कधीच कमी होणार नाही. परंतु आज काही ठिकाणी नदी व ओहळाचे पाणी अडवण्यात आल्याचे सरास आढळून येत आहे. खांडेपार येथे तर अशी चर्चा आहे की खांडेपार ओहोळाचे पाणी अडवून ते चक्क टँकर मध्ये भरण्यात येत आहे.  ही बाब जर खरी असेल तर पाणी विभागाच्या अभियंतानी तिथे जाऊन त्या संपूर्ण ओव्हाळाची पाहणी करायला हवी. नेमके पाणी कोण अडवतो याची माहिती घ्यायला हवी. ते टँकर कुणाचे हे पण जाणून घ्यायला हवे.

पाऊस लवकर येणे गरजेचेज्या तऱ्हेने  तापमान वाढलेले आहे ते  पाहता त्याचे परिणाम नदीवर सुद्धा होऊ शकतात. नदी आटण्याचे प्रमाण जोर धरू शकते. तेव्हा ठीक ठिकाणी लहानसहान बंधारे घालून पाणी अडवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर ओहोळ व नाल्यातले पाणी नदीत सोडण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. किंवा यावर्षी पाऊस लवकर यावा म्हणून देवाकडे याचना करावी लागेल.

 

टॅग्स :goaगोवाriverनदी