शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान जागृतीसाठी गुजरात आणि कर्नाटकमध्येही पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 19:35 IST

तब्बल ५२ दिवसांनी ती गोव्यात पोचली आणि मडगाव येथे समारोप झाला.

पणजी : अवयवदान आणि देहदान याबाबत लोकांमधील अंधश्रध्दा दूर होत चालल्याचे आशावादी चित्र दिसत असल्याचा दावा फेडरेशन ऑफ ऑर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेचे मुख्य प्रवर्तक पुरुषोत्तम पवार यांनी केला. यापुढे गुजरात व कर्नाटकमध्येही अवयवदानाबाबत जागृतीसाठी पदयात्रा काढण्याचा संकल्प संस्थेने सोडला आहे. 

मुंबई ते गोवा ५२ दिवसांची जागृती पदयात्रेचा समारोप मडगांव येथे झाल्यानंतर सोमवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील केईएम इस्पितळाकडून ही पदयात्रा सुरु झाली होती. तब्बल ५२ दिवसांनी ती गोव्यात पोचली आणि मडगाव येथे समारोप झाला. गोवा आणि कोकण भागात अवयवदान आणि देहदानाबाबत लोकांमध्ये गैरसमज असल्याचे आढळून आल्याने ही पदयात्रा आयोजत करुन जनजागृती घडवून आणल्याचे पवार यांनी सांगितले. गोव्यात मोहन एस. राव हे संस्थेचे काम पुढे नेतील तर उमेश ढवळीकर हे अ‍ॅम्बेसिडर म्हणून काम पाहतील. 

                                                             

                                       हातांचे यशस्वी रोपण फेडरेशन ऑफ ऑर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेच्या खजिनदार मीरा सुरेश यांनी अशी माहिती दिली की, हृदयविकाराने निधन झाल्यास डोळे आणि त्त्वचा सहा तासांच्या आत दान करता येते तसेच देहदान करता येतो. केरळमध्ये ब्रेन डेड घोषित केलेल्या व्यक्तीचे हातही काढून अन्य गरजू रुग्णावर त्याचे रोपण करण्यात आलेले आहे. मुंबईच्या केईएम इस्पितळात हातांचे रोपण यशस्वीरित्या झालेले आहे. ब्रेन डेड व्यक्तीचे देहदान करता येत नाही. हृदय चार तासांच्या आत, यकृत ८ तासांच्या आत तर फुफ्फुसे १२ तासांच्या आत रोपणासाठी वापरणे शक्य आहे. १९९४ चा मानवी अवयव रोपण कायदा वेळोवेळी गरजेनुसार दुरुस्त करण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात गेल्या वर्षी ५२ ब्रेन डेड व्यक्तींचे अवयव इतर गरजू रुग्णांसाठी वापरण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पवार म्हणाले की, गेल्या वर्षी नाशिक ते नागपूर आणि पुढे बाबा आमटे आश्रमापर्यंत अशी ५२ दिवसांची पदयात्रा काढण्यात आली होती. मुंबई-गोवा पदयात्रेत अनेक अनुभव आले. रत्नागिरी जिल्ह्यात इस्पितळांमध्ये अवयवदान किंवा देहदानासाठी कोणत्याच सुविधा नसल्याचे आढळून आले. काही ठिकाणी धार्मिक बाबी आडव्या येतात परंतु आता लोकांमधील अंधश्रध्दाही दूर होत चालल्याचे आशावादी चित्र दिसत असल्याचे पवार म्हणाले. 

मीरा सुरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत अवयवदान तसेच देहदानासाठी ३३ इस्पितळे तेथील आरोग्य खात्याकडे नोंदणीकृत आहेत. इस्पितळे तसेच डॉक्टरनी या कामासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. ‘रोटो’खाली गोव्याची अजून नोंदणी झालेली नाही. ही प्रक्रिया अजून चालू आहे. ‘रोटो’खाली महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्ये येतात. पत्रकार परिषदेस गोव्याचे संघटक मोहन राव हेही उपस्थित होते. 

टॅग्स :Organ donationअवयव दान