पणजी : सनातन संस्थाप्रश्नी अगोदर महाराष्ट्र सरकारच्या गृह मंत्रालयाचा अहवाल येऊ द्या. त्या अहवालातील निष्कर्ष पाहिल्यानंतरच त्याविषयी गोवा सरकार काय ती पावले उचलू शकेल, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी सांगितले. राजभवनवर राजेंद्र आर्लेकर यांचा मंत्रिपदाचा शपथविधी पार पडल्यानंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना सनातनवरील बंदीच्या मागणीविषयी विचारले असता, ते म्हणाले की, सनातनप्रश्नी महाराष्ट्रात चौकशी सुरू आहे. त्या चौकशीनंतर जे निष्कर्ष निघतील ते पाहून पुढील पावले आम्हाला उचलावी लागतील. मात्र, अजून आमच्याकडे महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाकडून काहीच आलेले नाही. सनातन ही दहशतवादी संघटना असल्याचे तुम्हाला वाटते काय, असे विचारले असता, आम्हाला तसा अनुभव आलेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. (खास प्रतिनिधी)
सनातन संस्थेबाबत महाराष्ट्राच्या अहवालाची प्रतीक्षा : पार्सेकर
By admin | Updated: October 2, 2015 02:42 IST