शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फोंडा नगरपालिकेच्या तेरा प्रभागासाठी मतदान, सरकारी यंत्रणा सज्ज

By आप्पा बुवा | Updated: May 4, 2023 19:58 IST

एकूण 14,271 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून  यामध्ये पुरुष मतदार हे 7 116 आहे तर महिला मतदार 7155 आहेत.

फोंडा - फोंडा नगरपालिकेच्या 13 प्रभागासाठी उद्या मतदान होणार असून, एकूण 22 मतदान केंद्रांवर सदरची निवडणूक होणार आहे. निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून सरकारी यंत्रणा सर्वतोपरी निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित 13 प्रभागासाठी आज मतदान होणार आहे. एकूण 14,271 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून  यामध्ये पुरुष मतदार हे 7 116 आहे तर महिला मतदार 7155 आहेत.

 विविध मतदान केंद्रावर सामुग्री घेऊन जाण्यासाठी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर निवडणूक संदर्भातील कर्मचारी गोळा व्हायला सुरुवात झाली होती. दुपारपर्यंत सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे मतदार केंद्र संबंधित सामग्री सुपूर्द करण्यात आली. संध्याकाळी चार पर्यंत सर्व मतदान केंद्रे सज्ज झाली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर व उपजिल्हाधिकारी फळदेसाई हे सर्व मतदान केंद्रावर जाऊन तयारीचा आढावा घेत असल्याचे आढळून आले.

 भाजप व रायझिंग फोंडा मध्ये खरी लढत : प्रचाराच्या सुरुवातीला भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार केल्याने भाजपने प्रचारात आघाडी घेतली होती. खासदार विनय तेंडुलकर, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर व  भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी सर्व प्रभागांमध्ये चांगल्या प्रमाणात व्यवरचना केली. सर्वानी घरोघरी प्रचारावर जास्त भर दिला.भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ दळवी हे बिनविरोध आल्याने त्यांना इतर प्रभागांमध्ये काम करण्यासाठी मोकळीक मिळाली. त्याचा फायदा नक्कीच भाजपला होईल.

 शेवटच्या पाच दिवसात मात्र डॉ. केतन भाटीकर यांच्या रायझिंग फोंडाने चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक प्रभागात काटे कि टक्कर अपेक्षित असून जो कोणी उमेदवार निवडून येईल तो अवघ्या काही मतानी निवडून येण्याची शक्यता आहे. शेवटच्या दिवशी जाहीर प्रचार जरी थांबलेला असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधने मात्र चालूच होते. युवा उमेदवारांनी यावेळी डिजिटल माध्यमाचा प्रचारासाठी चांगला उपयोग करून घेतल्याचे दिसून आले.

मतदान कमी होणार :प्रभाग वार उमेदवाराच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता मतदार यादीतील काही नावे अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. काही मतदारांनी  इतरत्र स्थलांतर केल्यामुळे ती नावे तशीच राहिली आहेत. परिणामी मतदानाची टक्केवारी कमी होण्याची जास्त शक्यता आहे. 

 

टॅग्स :Electionनिवडणूकgoaगोवा