शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

दुपारच्या झोपेसाठी देण्यात येईल अनिवार्य ब्रेक! बरोबर वाचल; 'या' राज्यात देण्यात आलं अनोखे निवडणूक आश्वासन

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 2, 2020 13:04 IST

विजय सरदेसाई यांचे म्हणणे आहे, की शास्त्रीय दृष्ट्याही हे तथ्य सिद्ध झाले आहे, की दुपारची झोप अथवा थोडी विश्रांती घेणाऱ्या लोकांची स्मरणशक्ती अत्यंत चांगली राहते. यामुळे, नोकरी करणारे लोकही चांगल्या प्रकारे काम करू शकतात.

ठळक मुद्देविजय सरदेसाई यांनी म्हटले आहे, की दुपारची झोप अथवा थोडी विश्रांती घेणाऱ्या लोकांची स्मरणशक्ती अत्यंत चांगली राहते. नोकरी करणारे लोकही चांगल्या प्रकारे काम करू शकतात.राज्यात मोठ्या बदलांसाठी सुसेगाडचे संरक्षण करण्याची आवश्यकता - सरदेसाई

पणजी - गोव्यात 2022मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी पुढील वर्षीच येथे निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, यापूर्वीच राजकीय पक्षांनी निवडणूक आश्वासने द्यायला सुरुवात केली आहे. यात गोवा फॉरवर्ड पार्टीने एक वेगळ्याच प्रकारचे निवडणूक आश्वासन दिले आहे.

गोवा विधानसभा निवडणूक 2022साठीचे पहिले निवडणूक आश्वासन समोर आले आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी घोषणा केली, की येणाऱ्या निवडणुकीत आपण मुख्यमंत्री झालो, तर दुपारी झोपण्यासाठी 2 ते 4 वाजेदरम्यान अनिवार्य आरामाच्या तासांची व्यवस्था करू.

सुसेगाड -गोव्याच्या ओळखीसाठी विजय सरदेसाई यांचा पक्ष गोवा फॉरवर्ड पार्टी अत्यंत आक्रमक राहिला आहे. विजय सरदेसाई यांचे म्हणणे आहे, की 'सुसेगाड'चे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. पोर्तुगीज शब्द सोसेगैडोपासून सुसेगाड शब्द आला आहे. याचा अर्थ 'शांती' आसा होतो. तसेच, दुपारची झोप सुसेगाडचा एक महत्वाचा भागच आहे. 

विजय सरदेसाई यांचे म्हणणे आहे, की शास्त्रीय दृष्ट्याही हे तथ्य सिद्ध झाले आहे, की दुपारची झोप अथवा थोडी विश्रांती घेणाऱ्या लोकांची स्मरणशक्ती अत्यंत चांगली राहते. यामुळे, नोकरी करणारे लोकही चांगल्या प्रकारे काम करू शकतात. याशिवाय यामुळे अलर्ट राहण्यासाठीही मदत मिळते. एवढेच नाही, तर माणसाचा मूडही चांगला राहतो.

गोव्याची संस्कृती -अनेकदा असेही दिसते, की दुपारी झोपण्याच्या सवईकडे लोक आळस म्हणूनही पाहतात. मात्र, हे विजय सरदेसाई यांना मान्य नाही. सरदेसाई यांचे म्हणणे आहे, की ही गोव्याची संस्कृती आहे. सर्वांनी याचा सन्मान करायला हवा. तसेच राज्यात मोठ्या बदलांसाठी सुसेगाडचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण