शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

वीज दरवाढीविरुद्ध विश्वजीत राणे यांचा एल्गार, वाढ स्थगित ठेवण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 20:12 IST

राज्यात सरासरी 11 टक्के वीज दरवाढ लागू करणे हा अत्यंत अमानवी स्वरुपाचा निर्णय आहे.

पणजी : राज्यात सरासरी 11 टक्के वीज दरवाढ लागू करणे हा अत्यंत अमानवी स्वरुपाचा निर्णय आहे. मी या निर्णयाचा आणि संयुक्त वीज नियमन आयोगाचाही निषेध करतो, असे पर्रीकर सरकारमधील आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी येथे सांगून जोरदार तोफ डागली. लोकांना ही वीज दरवाढ आणखी अडचणीत आणणार असून सरकारने येत्या 30 एप्रिलपर्यंत दरवाढ स्थगित ठेवावी, अन्यथा आपण हजारो लोकांना घेऊन पणजीत मेणबत्त्या घेऊन निषेध मोर्चा काढीन, असंही मंत्री विश्वजीत राणे यांनी जाहीर केलं. 

वीजेच्या प्रश्नाबाबत लोकांसोबत राहीन. खनिज खाण बंदीमुळे अगोदरच लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. तशात सरासरी 11 टक्के वीज बिल दरवाढ ही अत्यंत धक्कादायक आहे. लोकांमध्ये त्यामुळे चिड व्यक्त होत आहे. हे राज्य नोकरशहा चालवू शकत नाही. वीज नियमन आयोगाने जर केवळ 2-3 टक्के वीज दरवाढ केली असती तर ते एकवेळ समजून घेता आले असते. थेट 11 टक्के दरवाढ म्हणजे अतीच झाले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून येईर्पयत म्हणजे 30 एप्रिलर्पयत या दरवाढीची अंमलबजावणी करू नये. मी तीन मंत्र्यांच्या समितीला तसे पत्र सोमवारी लिहिणार आहे, असं विश्वजीत राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हंटलं. 

मंत्री राणे म्हणाले, की नोकरशहांकडेच सगळी सुत्रे देण्यासाठी आम्ही कुणी बिनडोक नव्हे. आम्हाला दर पाच वर्षानी निवडणुकीला सामोरे जावे लागते व त्यामुळे आम्ही लोकांना जबाबदार ठरतो. नोकरशहांना निवडणुकीस जावे लागत नाही. मी आणि माझा पक्ष भाजप हा लोकांसोबत आहे. वीज दरवाढ मागे घ्यायलाच हवी. निदान ती दि. 30 एप्रिलपर्यंत स्थगित करावी. अन्यथा दहा हजार लोकांना घेऊन पणजीत मेणबत्ती मोर्चा काढीन. मी शनिवारी सकाळी उसगावच्या भागात गेले होतो. तिथेही लोकांनी 11 टक्के वीज दरवाढीविरुद्ध तीव्र नापसंती व्यक्त केली. राज्य अगोदरच अडचणीत असताना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वीज दरवाढ कशी काय करता येते ते संयुक्त  वीज नियमन आयोगाने सांगावे. मी वीज मंत्री मडकईकर यांच्याविरुद्ध बोलत नाही.