शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३३ हजार कुटुंबांना विश्वजीत राणेंचे गिफ्ट; तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्याची दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 07:25 IST

नगरगाव येथे कार्यक्रम : सत्तरी व उसगावच्या लोकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई : सत्तरी तालुका आणि उसगावचा भाग अशा ठिकाणी मिळून एकूण ३३ हजार कुटुंबांना मंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांनी यावेळी चतुर्थीचे गिफ्ट दिले. मोठ्या प्रमाणात कडधान्य, तेल व अन्य साहित्य लोकांमध्ये वितरित करण्याचे काम सुरू आहे. काल, बुधवारी नगरगाव आणि मोर्ले अशा दोन ठिकाणी मोठे सोहळे झाले.

आरोग्यमंत्री तथा वाळपई मतदारसंघाचे आमदार विश्वजीत राणे यांनी नगरगाव येथे उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले. गणेश चतुर्थी सणावेळी लोक आनंदित असावे, कायम लोकांची चूल पेटावी यासाठी आपण मदतीचा हात दिला आहे. यापुढील काळात भाजप सरकार लोकांच्या रोजगाराचाही प्रश्न सोडविल. सावंत सरकार उपाययोजना करत आहे, असे मंत्री राणे म्हणाले.

यावेळी बोलताना मंत्री राणे म्हणाले की, 'सत्तरी तालुक्यात विविध प्रकारचे प्रकल्प उभे केले जातील. सत्तरीच्या जनतेच्या विकासासाठीच माझे राजकारण आहे. त्यासाठीच मी पाऊले उचलत आहे. आज गणेश चतुर्थीनिमित्ताने लोकांना मदतीचा हात देताना मला आनंद होत आहे. सत्तरी तालुक्यातील व उसगावच्या जनतेसाठी मी कायम अशा प्रकारे काम करत राहीन.

मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक

'मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जे विविध कायदे आणले आहेत, त्यातून सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन येईल. सामान्य लोकांची घरे कायदेशीर होतील' असे मंत्री राणे म्हणाले. दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल अशी बातमी मी वाचली. मला आनंद झाला. कामत हे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी कायम विकासाला साथ दिली. आता विद्यमान मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हेही राज्यात जोरात विकासकामे करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

चतुर्थी भेट कार्यक्रम

दरम्यान, उसगाव, नगरगाव, ठाणे, सावर्डे, म्हाऊस, वाळपई, खोतोडे, केरी, मोर्ले, पर्ये, पिसुर्ले आदी सर्व ठिकाणच्या जनतेसाठी चतुर्थी भेट कार्यक्रम सुरू आहेत. पर्ये मतदारसंघातील पंचायत क्षेत्रांमध्ये आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होत आहेत.

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण