शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

व्हिसा उल्लंघन प्रकरण : ६ इंडोनेशियन महिलांना ३१ आॅक्टोबरपर्यंत दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 22:13 IST

व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करण्यासाठी देश सोडण्याचा आदेश दिलेल्या सहा इंडोनेशियन महिलांना मुंबई उच्च न्यायायाच्या पणजी खंडपीठाने ३१ आॅक्टोबरपर्यंत देशात राहण्याची परवानगी दिली आहे. 

पणजी - व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करण्यासाठी देश सोडण्याचा आदेश दिलेल्या सहा इंडोनेशियन महिलांना मुंबई उच्च न्यायायाच्या पणजी खंडपीठाने ३१ आॅक्टोबरपर्यंत देशात राहण्याची परवानगी दिली आहे. गोव्यात वैद्यकीय कंपनीत प्रशिक्षक म्हणून नोकरीसाठी व्हिसा घेून आलेल्या ६ इंडोनेशियाच्या महिलांना गोवा पोलिसांच्या विदेश विभागाने देश सोडण्यासाठी नोटीस बजावली होती. व्हिसाचे नियम या महिलांकडून उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका त्यांचयावर ठेवण्यात आला होता. या महिलांकडून त्यांच्या गोव़्यातील वास्तव्याची माहिती कायद्यानुसार १४ दिवसांत विदेश विभागाला देणे आवशक होती. परंतु त्यांनी तसे केले नाही.  या शिवाय या महिला वैद्यकीय कंपनीत काम करण्याच्या कंत्राटावर आल्या होत्या, परंतु त्या स्पामध्ये मसाज देण्याचेही काम करीत होत्या असे आढळून आले आहे. हेही व्हिसा नियमांचे उल्लंघन ठरते. त्यामुळे त्यांना विदेश विभागाने देश सोडण्यास सांगितले होते. या प्रकरणात या युवतीनी खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने या प्रकरणात पुन्हा विदेश विभागाकडे जाण्याची सूचना त्यांना केली होती. विदेश विभागाने या प्रकरणात पुन्हा सुनावणी घेतली होती, परंतु आदेशात बदल केला नाही. त्यामुळे या युवतीना देश सोडणे भाग आहे. त्यासाठी त्यांना १८ आॅक्टोबरपर्यंत मूदत देण्यात आली होती. परंतु खंडपीठाने ती वाढवून आता ३१ आॅक्टोबर केली आहे. विदेश विभागाच्या आदेशानंतर या सहा महिलांनी खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठात सादर केलेल्या याचिकेत त्या महिलांनी आपली चूकही मान्य केली आहे, परंतु विदेश विभागासमोर स्पष्टीकरण देण्याची संदी देण्याची आणि या विभागाला आपल्या निर्णयाच्या बाबत फेर विचार करण्याची मागणी याचिकेत केली होती. न्यायमूर्ती एन एम जामदार व पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने त्यांना दिलासा देताना विदेश विभागाला या प्रकरणात पुन्हा एकदा सुनावणी घेऊन काय तो निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय