शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वेलिंगकर-ढवळीकरांचा राष्ट्रवादाआडून महाराष्ट्रवाद - विजय सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 17:22 IST

ओपिनियन पोलच्या मुद्दय़ावरुन राजकारण  करणारे गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर आणि मगोचे सुदीन ढवळकर हे दोघेही राष्ट्रवादाच्या नावाखाली अजूनही महाराष्ट्रवादच करत आहेत

मडगाव - ओपिनियन पोलच्या मुद्दय़ावरुन राजकारण  करणारे गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर आणि मगोचे सुदीन ढवळकर हे दोघेही राष्ट्रवादाच्या नावाखाली अजूनही महाराष्ट्रवादच करत आहेत. ओपिनियन पोलच्यावेळी आपण लोकांबरोबर होतो असे म्हणणाऱ्यांनी त्यावेळी गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राहावे यासाठी मतदान केले की विलिनीकरणाच्या बाजूने, असा सवाल नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी केला.

ओपिनियन पोल संदर्भात वक्तव्य करून सरदेसाई यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी आपले शब्द मागे घेत माफी मागावी अन्यथा 26 जानेवारीच्या कार्यक्रमात त्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशारा वेलिंगकर यांनी दिला होता. त्याचा समाचार घेताना सरदेसाई म्हणाले, ज्यावेळी गोवा मुक्त झाला त्यावेळी त्यावेळचे प्रधानमंत्री पं. नेहरू यांनी भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले, असे वक्तव्य केले होते. त्याच धर्तीवर आपण ओपिनियन पोल जिंकल्यावर गोवा खऱ्या अर्थाने मुक्त झालो, असे वक्तव्य केले होते. गोवा मुक्तीने गोमंतकीयांना भारतीय बनविले. मात्र ते खऱ्या अर्थाने गोंयकार ओपिनियन पोलच्या निकालानंतरच झाले. हे माझे ठाम मत असून, त्यासाठी मी कुणाचीही माफी मागणार नाही. जर कुणाला काळे झेंडे दाखवायचे असतील तर त्यांनी अवश्य दाखवावेत त्यांनाही आम्ही पाहून घेऊ, असे प्रतिआव्हान सरदेसाई यांनी दिले.सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सरदेसाई म्हणाले, गोवा मुक्ती लढय़ातील स्वातंत्र्य सैनिकांबद्दल मला आदर आहे, किंबहुना गोवा मुक्ती लढा आणि विलिनीकरणविरोधी लढा या दोन्ही लढय़ांशी माझ्या  कुटुंबियांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे मी स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणो शक्यच नाही. माझे घर गोवा मुक्ती लढय़ातील स्वातंत्र्य सैनिकांचा अड्डा होता त्यामुळेच माझे वडील ज्यावेळी अमेरिकेतून लिस्बनमध्ये गेले त्यावेळी त्यांचा पासपोर्ट पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अराष्ट्रीय असा ठपका ठेवून बाहेर फेकून दिला होता. पोर्तुगालच्या दफ्तरात अजूनही ही नोंद आहे. त्यामुळे राष्ट्रवादासंदर्भात कुणीही आम्हाला शिकवू नये, असे सरदेसाई म्हणाले.डॉ. जॅक सिक्वेरा यांनी गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी जे कार्य केले आहे त्याची दखल गोमंतकीयांना घ्यावीच लागेल. गोव्यातील वेगवेगळ्या गावातून डॉ. सिक्वेरा यांचे पुतळे उभे रहातील, असेही सरदेसाई यांनी ठामपणे सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण