शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकाना निधी मिळत नसल्याने ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 15:47 IST

गोव्यातील नगरपालिकांसाठी सरकारच्या अर्थ खात्याकडून निधीच उपलब्ध होत नसल्याने नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे संतप्त बनले आहेत. डिसोझा हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत.

पणजी : गोव्यातील नगरपालिकांसाठी सरकारच्या अर्थ खात्याकडून निधीच उपलब्ध होत नसल्याने नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे संतप्त बनले आहेत. डिसोझा हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत.डिसोझा हे मध्यंतरी दीड महिना विदेशात दौऱ्यावर होते. आता त्यांनी आपल्या खात्याचे काम नियमितपणे सुरू केले आहे. बुधवारी 'लोकमत'शी बोलताना डिसोझा म्हणाले की,  माझ्याकडे येणाऱ्या फाईल्स मी हातावेगळ्या करत आहे. पण जास्त महत्वाचे विषय सध्या माझ्याकडे येत नाहीत. माझ्या खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या नगरपालिकांना सरकारकडून निधीच मिळत नाही. यामुळे अडचण झाली आहे. पालकांची कामे अडून राहत आहेत.डिसोझा म्हणाले की,  गेल्यावर्षी अर्थसंकल्पात पालिकांसाठी तरतूद करण्यात आली आहे. मात्र हा अर्थसंकल्पीय निधी देखील पालिकांना मिळत नाही. नगरपालिकांना त्यांच्या हक्काचा निधी तरी सरकारने द्यायला हवा. केंद्र सरकारकडून पालिकांना आलेला निधी देखील राज्य सरकार वेळेत पालिकांकडे पोहचता करत नाही. पालिकांना निधी द्यावा अशी विनंती मी तीन-चारवेळा मुख्यमंत्र्यांना केली आहे. ते निधी देतोच असे प्रत्येकवेळी सांगतात पण पालकांना निधी मिळालेला नाही. तसेच, डिसोझा म्हणाले की माझ्या स्वतःच्या म्हापसा मतदारसंघातील म्हापसा पालिकेला दहा कोटीचा निधी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. सात कोटींच्या निधीसाठी फाईलवर प्रक्रिया सुरू आहे. अजून तरी निधी मिळालेला नाही.दरम्यान, गोव्यातील पालिका आणि पंचायती यांच्या कामाविषयीची एक याचिका बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठापुढे सुनावणीस आली. कचरा गोळा करणे आणि त्या कचर्‍याची विल्हेवाट लावणे हे काम पार पाडण्याविषयी करण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सरकारकडे पुरेसे अधिकार आहेत याची आठवण न्यायालयाने बुधवारी सरकारला करून दिली. ही अवमान याचिका सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रीग्ज यांनी सादर केलेली आहे.

टॅग्स :goaगोवा