शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात जाणाऱ्या वाहनांना आता टोल द्यावा लागणार; गोव्याच्या प्रस्तावाला गडकरी यांची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 22:37 IST

मंत्री गडकरी यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत.एन्ट्री पाॅईटवरच टोलनाके उभारू शहरीभागात नको अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सावंतवाडी : गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना आता टोल भरावा लागणार असून हे टोल नाके गोव्याच्या एन्ट्री पाॅईट म्हणजेच पत्रादेवी व कोळे या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.तसा प्रस्ताव गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याकडून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आला आहे. मंत्री गडकरी यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत.एन्ट्री पाॅईटवरच टोलनाके उभारू शहरीभागात नको अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.मात्र हे टोलनाके कधी बसविण्यात येणार तसेच कधीपासून टोल घेण्यास सुरुवात करणार याची अद्याप निश्चीती झाली नाही. केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी महाराष्ट्र गोवा व कर्नाटक राज्यातील रस्ते महामार्गाच्या प्रकल्पाबाबत गोवा येथे बैठक पार पडली या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ.प्रमोद सावंत केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंग,केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सह तीन राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत मंत्री गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्ते महामार्ग प्रकल्पावरून अधिकारी व ठेकेदार यांची चांगलीच झाडाझडती घेतली जे अपूर्ण प्रकल्प आहेत ते फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली असून निधीची कुठे ही कमतरता भासणार नसल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मुंबई गोवा महामार्गा बाबत त्यांनी या बैठकीत आढावा घेत अधिकाऱ्यांना काहि सूचना केल्या कामे थांबवू नका वेळेत कामे पूर्ण झाली पाहिजेत असा कडक इशारा त्यांनी दिला.

दरम्यान मोपा विमानतळाला जोडला जाणारा महामार्ग फेब्रुवारी अखेर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत मंत्री गडकरी यांनी दिल्या असून कामाबाबत ही समाधान व्यक्त केले.तर पत्रादेवी ते काणकोण पर्यंतच्या रस्त्या मध्ये काहि ठिकाणी महामार्गाचे काम थांबले आहे ते काम लवकरात लवकर पूर्ण  करा असे सांगितले तसेच गोव्याच्या दोन्ही एन्ट्री पाॅईट वर टोल नाके उभारण्याचे ही या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दोन एन्ट्री पाॅईट वर टोल नाके उभारण्याची सूचना केली.त्यात महाराष्ट्र तून एन्ट्री करतना पत्रादेवी तर कर्नाटक मधून येतना कोळे या दोन ठिकाणी हे टोल नाके असणार आहेत मात्र शहरी भागात टोलनाके उभारण्यास मंत्री गडकरी यांनी असमर्थता दर्शवली असून एन्ट्रीला टोल नाके उभारण्यास तत्वता मान्यता दिली आहे.

महाराष्ट्रात 605 अपघात प्रवण क्षेत्र महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावर 605 ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र  आहेत तसा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे.ही अपघात प्रवण क्षेत्र काढून टाकण्यासाठी केंद्र सरकार निधी देणार असून यातून या रस्त्याची कामे करण्यात येणार आहेत.देशात 18 ते 45 वयोगटातील व्यक्तीचे अपघात अधिक होतात त्यात बरेच मृत्युमुखी ही पडतात असे निरिक्षण ही यावेळी मंत्री गडकरी यांनी नोंदवले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीgoaगोवाtollplazaटोलनाका