शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वेदांता खाण कंपनीने 97 कोटी रुपये भरावे, खाण खात्याकडून 14 दिवसांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 22:00 IST

वेदांता खनिज खाण कंपनीने 2010- 2011 आणि 2012-13 या कालावधीत केलेल्या खनिज व्यवसायावरील रॉयल्टीपोटी गोवा सरकारच्या तिजोरीत व्याजासह एकूण 97 कोटी 48 लाख रुपये जमा करावेत, असा आदेश तथा डिमांड नोटीस सरकारच्या खाण खात्याने मंगळवारी जारी केला आहे.

पणजी : वेदांता खनिज खाण कंपनीने 2010- 2011 आणि 2012-13 या कालावधीत केलेल्या खनिज व्यवसायावरील रॉयल्टीपोटी गोवा सरकारच्या तिजोरीत व्याजासह एकूण 97 कोटी 48 लाख रुपये जमा करावेत, असा आदेश तथा डिमांड नोटीस सरकारच्या खाण खात्याने मंगळवारी जारी केला आहे. चौदा दिवसांची मुदत वेदांताला खाण खात्याने दिली आहे.

2009 सालचे मिनरल कनसेशन्स दुरुस्ती नियम अंमलात आल्यानंतर वेदांता कंपनीने वॉट मेट्रीक टन पद्धतीने रॉयल्टी भरणे बंद केले, असे खात्याने आदेशात म्हटले आहे. 2007 ते 2008 पासून 2011-2012 कालावधीपर्यंत कार्यरत राहिलेल्या लिजांचे व्यापक ऑडिट करण्याचे काम राज्य सरकारने अलिकडेच सुरू केले. चार्टर्ड अकाऊण्टंटमार्फत हे ऑडिट करून घेतले गेले. ऑडिट समितीने अनेक निरीक्षणे नोंदवली आहेत. वेदांताने  2010- 2011 आणि 2012-13 या कालावधीत एकूण 54 कोटी 48 लाख 3 हजार 948 रुपयांची रॉयल्टी भरली नाही. यावर वार्षिक 24 टक्क्यांनुसार 43 कोटी 30 हजार 642 रुपयांचे व्याज लागू होते, असे खाण खात्याचे म्हणणे आहे.4 ऑगस्ट 2016 रोजी याविषयी वेदांताला नोटीस पाठवून मग सुनावणी घेण्यात आली. वेदांताचे म्हणणे लेखी स्वरुपात व तोंडी स्वरुपात सादर झाले. ड्राय मेट्रिक टन व वॉट मेट्रीक टन असा वेदांताच्या रॉयस्टीविषयी मुद्दा होता. हा मुद्दा सरकारसमोर मांडला गेला. सरकारने वेदांताचे म्हणणे फेटाळून लावले आहे व व्याजासहीत रॉयल्टी भरण्यास सांगितले आहे हे खाण खात्याने आदेशात नमूद केले आहे. चौदा दिवसांत ही थकबाकी भरावी. ही थकबाकी भरली म्हणून तुम्ही अन्य कारवाईमधून मोकळीक मिळवू शकत नाही, असेही खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य यांनी आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळा