शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत रेल्वे शनिवारी कोकण रेल्वे मार्गावर धावणार!

By सूरज.नाईकपवार | Updated: May 31, 2023 18:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन

सूरज नाईक पवार, मडगाव: बहुचर्चित वंदे भारत ही रेल्वे कोकण मार्गावरून कधी धावणार याची प्रतीक्षा आता संपली आहे. मडगाव ते मुंबई मार्गावर धावणारी वंदे भारत रेल्वे शनिवारी ३ जून रोजी या मार्गावर धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या या रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करतील, तर मडगावच्या काेकण रेल्वेस्थानकावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे या रेल्वेला झेंडा दाखवतील. मडगावहून ही रेल्वे मुंबईतील श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपर्यंत धावणार आहे. कोकण रेल्वे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी ही माहिती दिली.

ही रेल्वे संपूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. हल्लीच मुंबई येथून छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगावदरम्यान गाडी चालविण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून ‘ट्रायल रन’ यशस्वीपणे घेण्यात आली होती. चेन्नईतील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमधून ही रेल्वे तयार करण्यात आली आहे.

गोवा हे पर्यटन राज्य असल्याने या रेल्वेचा या राज्यालाही लाभ होणार आहे. तसेच शेजारच्या सिंधुदुर्ग राज्यातील पर्यटनालाही ही रेल्वे लाभदायक होईल. साधारणत: साडेपाचशे प्रवासी या रेल्वेतून प्रवास करतील. या रेल्वेला आठ डबे आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी घाटगे यांनी दिली.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस