शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदार ओळखपत्र वापरा अथवा अन्य पर्याय स्वीकारा - निवडणूक आयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 20:28 IST

लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

पणजी : लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. तसेच मतदारांनी या निवडणुकांवेळी फोटो मतदार ओळखपत्र (एपीक कार्ड) सादर करावे किंवा ते सादर करू न शकणा-या मतदारांनी एकूण अकरा पर्यायांपैकी एक कोणताही पुरावा सादर करावा, असे आयोगाने एका आदेशाद्वारे कळविले आहे.गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. कुणाल यांनी निवडणूक आयोगाचा आदेश सोमवारी राजपत्रत अधिसूचित केला आहे. ज्या मतदारांना निवडणूक आयोगाने फोटो मतदार ओळखपत्र दिलेले आहे, त्यांनी एपीक कार्ड सादर करावे. जर ते सादर करू शकले नाहीत तर त्यांनी अकरापैकी कोणताही एक पुरावा सादर करून मतदानावेळी स्वत:ची ओळख पटविणो गरजेचे आहे, असे आयोगाने म्हटले आहे. एखाद्या एपीक कार्डवरून जर मतदाराची ओळख पटत असेल तर मग त्या कार्डावरील अक्षर चूक किंवा कार्डावरील अन्य एखादी टायपिंग चूक वगैरे नगण्य मानली जावी, त्याकडे दुर्लक्ष केले जावे, असे आयोगाला अपेक्षित आहे. पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, केंद्र किंवा राज्य सरकारने किंवा पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी किंवा सार्वजनिक आस्थापनांनी फोटोसह कर्मचा-याला दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाने दिलेले पासबूक (फोटोसह), पॅन कार्ड, एनपीआरखाली आरजीआयने दिलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, मजूर मंत्रालयाच्या योजनेखाली दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, फोटोसह असलेले पेन्शनविषयक कागदपत्र, आमदार, खासदारांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे व आधार कार्ड यापैकी एक कोणताही पुरावा मतदाराला सादर करावा लागेल. लोकसभेसोबतच गोव्यात विधानसभेच्या रिक्त मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होतील हे स्पष्ट झाले आहे. येत्या दि.9 पर्यंत कधीही निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होऊ शकते, असे सुत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Electionनिवडणूक