शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

एस टींना लक्ष्य करण्यासाठी गोव्यात अर्बन नक्षललाईट्स वावरताहेत

By वासुदेव.पागी | Updated: December 30, 2023 14:38 IST

एसटींना जवळ करण्याचा मुख्यमंत्र्यांचा भाजप पदाधिकाऱ्यांना संदेश

पणजीः अनुसूचित जमातीच्या समाजाच्या लोकांना जवळ करा. कारण राज्यात अर्बन नक्क्षलवादी फिरत असून या समाजातील लोकांना ते लक्ष्य करीत आहेत असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी  आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे. 

पणजीतील मिनेझीस ब्रागांझा सभागृहातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत  मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना समाजाच्या तळागाळात पोहचण्याचा संदेश दिला. विशेष करून अनुसूचित जमात समाजातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांना जवळ करा. ते आपले मतदार आहेत, परंतु प्रत्यक्ष पक्षाच्या कामात त्यांना सामावून घ्या. कारण अर्बन नक्षलवादी आता गोव्यातही पोहोचले असून या समाजाला विध्वंसक दिशेने नेण्यासाठी ते लक्ष्य करीत आहेत असे त्यांनी सांगितले. 

राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा संदेश त्यांनी दिला. भाजपच्या राज्यासरकारच्या सर्व योजना तसेच केंद्र सरकारच्या सर्व योजनांची माहिती त्यांना द्या. मश्चिमारांपर्यंतही पोहोचा असे त्यांनी सांगितले.

राज्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ हे यावेळी भाजपच जिंकणार आहेत यात संशय नाही, परंतु आपल्याला मोठ्या मताधिक्याने  हे विजय मिळवायचे आहेत. दक्षिण गोव्यात तर आपल्याला ६० हजार मताधिक्याने विजय मिळवायचा आहे असे त्यांनी सांगितले. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद शेट तनावडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.