शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा आंबा काजू पिकालाही फटका - शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2024 15:47 IST

सत्तरीतील शेतकरी रामा गावकर म्हणाले यंदा आमचे काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घटले त्यामुळे नुकसान झाली. आता कुठे आंबा पिकायला आले होते.

नारायण गावस 

पणजी: राज्यात आताच कुठेतरी स्थानिक आंब्याची आवक वाढली होती पण शनिवारी  झालेल्या वादळी वाऱ्यासह  मुसळधार पावसामुळे आंबा पिकाला फटका बसला आहे. पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता  हवामान खात्याने वर्तविली असल्याने यंदा आंबा पीक नुकसानीत येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यंदा अगोदरच काजू उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे त्यात आता आंब्याचा पिकावरही या पावसाचा परिणाम जाणवला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी  चिंताग्रस्त असून कृषी खात्याने आर्थिक सहाय करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडू्न केली जात आहे.  राज्यात शनिवारी झालेल्या पावसाने पिकायला आलेला आंबा वादळी वाऱ्याने झडला. तसेच काजू पिकावरही याचा परिणाम झाला. माेठ्या  प्रमाणात कच्चे आंबेही पडल्याने आंबा उत्पादकांना  नुकसान झाले.

सध्या मे महिना सुरु असल्याने मानकुराद तसेच हापूस आंबे पिकायला आले आहेत. अनेक आंबाउत्पादकांनी ते काढून पिकायला घातले आहे. तर अनेक आंबे हे झाडावरच होते पण अवकाळी पावसामुळे या आंब्याचे पीक झडले आहे. या वर्षी अगोदर आंबे पीक हे कमी  होते त्यात आता हा निसर्गकडून नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

सत्तरीतील शेतकरी रामा गावकर म्हणाले यंदा आमचे काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घटले त्यामुळे नुकसान झाली. आता कुठे आंबा पिकायला आले होते.  त्याला दरही ५०० ते ७०० डझन पर्यत मिळत होता. पण शनिवारी झालेल्या वादळी पावसाने आंबा गळून पडल्याने ते कुजले आहेत.  त्यामुळे आंब्याचे नुकसान यंदा सहन करावे लगणार आहे. त्यामुळे कृषी खात्याने नुकसान भरपाई द्यावी, असे ते म्हणाले.

केपेचे शेतकरी उल्हास वेळीप म्हणाले यंदा हवामानाचा फटका बसल्याने काजू  उत्पादन ५० टक्क्यांनी घटले. आंबा लागवडही  यंदा कमी झाली होती. त्यात आता हा अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. आंब्याच्या बागायतीत असलेले मानकुराद आंबे पावसामुळे कुजले आहेत. आणखी पुढील १५ दिवस तरी पाऊस नसला तर हे  आंबे आम्हाला मिळू शकतात.