शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

'निश्चयाचा महामेरू'; नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 12:56 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सर्वतोपरी सहकार्य आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत यांच्या अथक प्रयत्नाने समस्त गोमंतकीय जनतेचे स्वप्न सत्यात उतरत आहे.

संदेश साधले, - समन्वयक, प्रसार माध्यम विभाग, गोवा- भाजपा

गोव्याच्या विकासातील मेरूमणी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या झुआरी पुलाच्या दुसऱ्या मार्गाचे (लेन) उद्‌घाटन २२ डिसेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तथा भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे.

भाजपा सरकारच्या गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात गोव्याची भरभराट झाली आहे २०१२ मध्ये राज्यात आधुनिक गोळ्याचे शिल्पकार तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेत आले.त्यानंतर २०१७ मध्ये पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपाने सत्ता मिळवली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशात भाजपाची एकहाती सत्ता आली, या काळात स्व. परीकर यांनी राज्यात विकासकामांचा धडाका लावला, त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या डॉ. प्रमोद सावंत यांनी स्व. परीकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज्याचा विकासरथ पुढे नेला. 

२०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने न भूतो.. असे यश मिळवले, २०१२ पासून राज्यात सुरू झालेला विकास कायम असून यापुढेही तो असाच राहील, राज्यात पायाभूत सुविधांसह मोठमोठे विकास प्रकल्प साकारण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओ. पी. नहा यांच्या बरोबरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही मोठा वाटा आहे. सर्वसामान्य जनतेचा विचार करणारा नेता म्हणून गडकरी यांची ओळख आहे.

"जे ठरवले ते करून दाखवले' असा 'निश्चयाचा महामेरु' म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. सार्वजनिक बांधकाम खाते त्यांचे आवडीचे. देशातीलच नव्हे तर सर्व राज्यांतील अनेक नेते केवळ स्वतःचे खिसे भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी आग्रही असतात, नितीन गडकरी याला एकमेव अपवाद म्हणता येतील, राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये कढ व्हावी तसेच सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुधारावे यासाठी गडकरी यांनी महाराष्ट्रात १९९७ साली युतीची सता येताच बांधकाम खाते आपल्याकडे घेतले.

महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री या नात्याने गडकरी यांनी रस्ते, पूल बांधण्यात विक्रमी कार्य केले. दररोजच्या धक्काबुक्कीला कंटाळलेल्या मुंबईकरांना उड्डाण पुलांचे जाळे निर्माण करून दिलासा दिला. इतकेच नव्हे तर मुंबई-पुणे हा अशक्य वाटणारा महत्त्वाकांक्षी एक्सप्रेस हायते पूर्ण केला दहा वर्षांपूर्वी देशात भाजपाची सत्ता आल्यापासून नितीन गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रिपद सांभाळत आहेत, गेल्या दहा वर्षांत त्यांनी देशातील बहुतांश राष्ट्रीय जाणि राज्य महामार्गाचा मोठ्या प्रमाणात विकास केला, याशिवाय आवश्यक त्या सर्व ठिकाणी पूल निर्माण केले. दर्जा आणि गुणवता यात कधीही तडजोड न करणारा मंत्री म्हणून त्यांचा धाक आहे. 

अभ्यासू आणि जिज्ञासु म्हणूनही त्यांना ओळखले जाते, कोणताही विषय पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय ते कोणतेही काम हाती घेत नाहीत. लोकांची केवळ मते मिळवायची म्हणून आवाक्याबाहेरची आश्वासने ते कधीही देत नाहीत, हजरजबाबीपणा हा त्यांचा आणखी एक विशेष गुण होय, कोणत्याही विषयाची मुद्देसूद आणि कोणताही आडपडदा न ठेवता सत्य मांडणी करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या या गुणांमुळे केवळ स्व पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील नेतेही त्यांचा आदर आणि सन्मान करतात.

गेल्या दहा वर्षात गोव्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती झाली, महामार्गासह राज्य महामार्गही सुधारले. राज्यातील शहरांसह ग्रामीण भागातही आवश्यक त्या ठिकाणी पूल उभारण्यात आले. आता दुसन्या मार्गाचे उद्‌द्घाटन होत असलेला झुभारी पून वापैकीच एक होय. मांडवी नदीवर उभारलेला अटल सेतू देशातील तिसरा सर्वांत लांब केवल स्टेड पूल आहे यासाठी सुमारे ५५० कोटी रुपये खर्च झाले. दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारा झुआरी पूल हा राज्याच्या विकासातील मानाचा तुरा. तब्बल अडीच हजार कोटी रुपये खर्च करून बांधला गेलेला हा पूल ८ मार्गी आहे. देशातील दुसरा सर्वात लांब केयल स्टेड पूल म्हणून याची गणना होत असून या ठिकाणी फिरते उपाहारगृह भव्य कला दालन, वेधशाळा आणि पर्यटकांसाठी दोन पाहणी टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सर्वतोपरी सहकार्य आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत यांच्या अथक प्रयत्नाने समस्त गोमंतकीय जनतेचे स्वप्न सत्यात उतरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मंत्री नितीन गडकरी यांच्यासह बहुतांश केंद्रीय मंत्र्यांनी गेल्या दहा वर्षात राज्याला भरभरून निधी दिला आहे. यापुढेही त्यांचे गोव्यावरील हे प्रेम असेच वृद्धिंगत होईल यात शंका नाही.

 

टॅग्स :goaगोवाNitin Gadkariनितीन गडकरीNitin Gadkariनितीन गडकरी