शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'अखंडित 24 तास वीजपुरवठा नाही, तोपर्यंत वीज दरवाढ नाहीच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 21:38 IST

ते म्हणाले की, ‘वरील उपकेंद्रांसाठी प्रत्येकी 140 कोटी रुपये खर्च येणार होता.

पणजी : वेर्णा आणि तुयें येथे वीज उपकेंद्र उभारण्याचा नाद सरकारने सोडला आहे. साळगांव येथील नियोजित मानवरहित उपकेंद्रासाठी मात्र येत्या अडीच महिन्यात निविदा काढल्या जातील. येत्या मे महिन्यापर्यंत साळगांवसह आसगांव, कांदोळी, कळंगुट, शिवोली, हणजुण भागाची विजेची ९५ टक्के समस्या निकालात येईल, असा दावा वीजमंत्री निलेश काब्राल यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत काब्राल म्हणाले की, २010 साली कुंकळ्ळी येथे वीज उपकेंद्र उभारले. मात्र, केवळ 30 टक्के वापर झाला. नवी उपकेंद्रे उभारण्यापेक्षा सध्या अस्तित्त्वात असलेली यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला जाईल. वेर्ला, काणका येथे भूमिगत वीज वाहिन्या लवकरच विद्युतभारित केल्या जातील.

ते म्हणाले की, ‘वरील उपकेंद्रांसाठी प्रत्येकी 140 कोटी रुपये खर्च येणार होता. हा खर्च सध्या तरी सरकारच्या आवाक्याबाहेरचा आहे. कुंकळ्ळीचे उदाहरण पाहता ही नियोजित उपकेंद्रे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. थिवी उपकेंद्राला गरज असल्याने कुंकळ्ळीहून 50 एमव्हीए ट्रान्स्फॉर्मर थिवीला आणला जाईल. याशिवाय या उपकेंद्रावक अतिरिक्त 42 एमव्हीए लोड निर्मिती होईल. पुढील अडीच महिन्यात हे काम पूर्ण केले जाईल. वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीसाठी पुरेशी वीज उपलब्ध असल्याचे काब्राल म्हणाले. बोगदा, वास्को येथे 33 बाय 11 केव्हीचे दोन ट्रान्स्फॉमर्स येतील. या शिवाय 10 एमव्हीएचे दहा आणि 6 एमव्हीएचे ट्रान्स्फॉर्मर्सही मागविले जातील. फोंडा येथील वीज उपकेंद्र 50 वर्षे जुने आहे. या उपकेंद्रासह आणखी काही उपकेंद्रांचा दर्जाही वाढविला जाईल, अशी माहिती काब्राल यांनी दिली. मुख्य अभियंता केणी, खात्याचे कार्यकारी अभियंता, साहाय्यक अभियंता यांची बैठक घेऊन काब्राल यांनी त्यांच्याकडून वीज स्थितीचा आढावा घेतला. 

24 तास अखंडित वीज पुरवठा होत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य ग्राहकांसाठी दरवाढ नाहीच : काब्राल सरकार 24 तास अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत दरवाढीची कोणतीही झळ सर्वसामान्य ग्राहकांना बसणार नाही, असे काब्राल यांनी स्पष्ट केले. येत्या 5 फेब्रुवारी रोजी संयुक्त वीज नियमन आयोगासमोर सुनावणी आहे. केवळ औद्योगिक वापरासाठीचे दर वाढतील. सर्वसामान्यांना झळ पोचणार नाही. घरगुती वापरासाठीच्या विजेचा दर एक पैसाही वाढलेला नाही, असे ते म्हणाले.

काब्राल म्हणाले की, ‘वीज दरांच्या बाबतीत काही चुका होत्या त्या दुरुस्त केलेल्या आहेत. 400 पेक्षा अधिक युनिट वापरल्यास युनिटमागे कमी आकारणी होत होती ती आता वाढविण्यात आली आहे. सध्या घरगुती वापरासाठीच्या विजेसाठी 0 ते 100 युनिटसाठी 1 रुपया 40 पैसे प्रती युनिट, 101 ते 200 युनिटकरिता 2 रुपये 10 पैसे प्रती युनिट, 201 ते 300 युनिटसाठी प्रती युनिट 2 रुपये 65 पैसे, 301 ते 400 युनिटकरीता प्रती युनिट 3 रुपये 45 पैसे आकारणी केली जाते. यात कोणताही बदल केलेला नाही. 401 व त्यापेक्षा अधिक युनिट झाल्यास ४ रुपये प्रती युनिट लागू होतील.

टॅग्स :goaगोवाelectricityवीज