शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात आदिवासी उपनियोजन फंड वापराविना, विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांकडून नाराजी व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 21:15 IST

आदिवासी उपनियोजन योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग विविध खात्यांकडून होत नसल्यामुळे आमदारांकडून विधानसभेत नाराजी व्यक्त करण्यात आली.

पणजी: आदिवासी उपनियोजन योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीचा उपयोग विविध खात्यांकडून होत नसल्यामुळे आमदारांकडून विधानसभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. या खात्यांवर कोण देखरेख ठेवणार ? असा प्रश्न विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर आणि निलेश काब्राल यांनी केला.कवळेकर यांनी हा तारांकित स्वरूपाचा प्रश्न उपस्थित केला होता. आदिवासी उपनियोजनाअंतर्गत राज्याला यंदा २० कोटी रुपये निधी आल्याची माहिती आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेत दिली. हा निधी सर्व खात्यांना वितरीत केला जातो, परंतु सर्व खाती हा निधी वापरत नसल्याचे आढळून आल्याची माहिती कवळेकर व नंतर निलेश काब्रा यांनीही दिली. या खात्यांकडून कामे करून घेण्याच्या बाबतीत काही देखरेख यंत्रणे आहेत काय ? किंवा अनुसूचित जाती जमाती खाते त्यांच्यावर देखरेख ठेऊ शकेल काय यावर दोन्ही आमदारांनी प्रश्न विचारले.केंद्राकडून मिळालेला निधी विविध खात्यांकडून वापरला जात नसल्याची कबुली मंत्री गावडे यांनीही दिली. यावर गांभिर्याने विचार होईल असे ते म्हणाले. हा निधी वापरण्यात आला नाही तर तो इतर खात्यात वळविण्याचे प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. परंतु कायद्या अंतर्गत तसे करणे शक्य नसल्याचे आणि मंत्र्यांनी तसे करूही नये असे आमदार निलेश काब्राल यांनी सांगितले. त्या ऐवजी ज्या खात्यात आदिवासी उपनियोजन फंडाचा वापर केला जात नाही त्या खात्याकडून तो करून घेण्यासाठी यंत्रणे उभारण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान आदिवासी कल्याण खात्याकडून चांगले काम केले जात असल्याचे प्रशस्तीपत्र विरोधी नेते कवळेकर यांनी गावडे यांना दिले.

टॅग्स :goaगोवा