शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सोळाव्या शतकातील चर्चच्या वैभवावर अप्रतिम छायाचित्रांमधून उजेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 20:08 IST

गोव्यातील चारशेपैकी अनेक चर्चना भेट देऊन एकूण 21 चर्चशी निगडीत आतील व बाहेरील वास्तूकलेचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन कक्कर यांनी मांडले आहे.

पणजी : गोव्यात येणे म्हणजे केवळ मद्य पिणे असे पर्यटकांनी समजू नये. गोवा म्हणजे अध्यात्माचेही हब आहे. सोळाव्या व सतराव्या शतकातील वास्तूकलेचा उत्कृष्ट नमूना असलेल्या दिमाखदार चर्च इमारती म्हणजे गोव्याच्या आध्यात्मिक कोंदणातील हिरे आहेत याची प्रचिती महिला छायाचित्रकार पायल कक्कर यांच्याशी बोलताना व त्यांनी भरविलेले छायाचित्र प्रदर्शन पाहिल्यानंतर शनिवारी आली. गोव्यातील चारशेपैकी अनेक चर्चना भेट देऊन एकूण 21 चर्चशी निगडीत आतील व बाहेरील वास्तूकलेचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन कक्कर यांनी मांडले आहे. लॅटीनेट भारतीय स्टाईलमधील गोव्यातील चर्चेस जगात वेगळ्य़ा कशा ठरतात ते फोटोग्राफी पाहून सहज कळून येते.

जुनेगोवे येथे पुराणवास्तू संग्रहालयाच्या जागेत सेंट फ्रान्सिस ऑफ आस्सिीसी चर्चमध्ये कक्कर यांचे फाईन आर्ट डोक्युमेंटरी फोटोग्राफी प्रदर्शन भरले आहे. अनेक गोमंतकीयच तिथे पोहचलेले नाहीत पण रोज शेकडो पर्यटक या प्रदर्शनाला भेट देतात व प्रभावीत होतात. गोवाभरातील चर्चमधील सुबक, नेत्रदीपक व आकर्षक नक्षीकाम, कोरीवकाम व लाकूडकाम कक्कर यांनी फोटोग्राफीमध्ये टीपले आहे. केवळ जुनेगोवेच्या टोलेजंग अशा मोठय़ा चर्चेस लोकांना ठाऊक आहेत पण गोव्यातील विविध भागांमध्ये चारशे ते पाचशे वर्षाहून जुन्या चर्चमध्ये सौंदर्याचे व प्राचिन कलेचे मोठे भांडार आहे याची अनुभूती कक्कर यांची फोटोग्राफी पाहताच कळून येते. सेंट झेव्हियर्स  व जिझस तसेच सांतामोनिका आदींच्या मोठय़ा प्रतिमा काही चर्चमध्ये आहेत. दिवाडी, साळगाव, सांतान-तळावली, रेईशमागूश, पोंबुर्पा, सांताक्रुझ आदी अनेक ठिकाणच्या चर्चमध्ये प्रवेश मिळवून तेथील सगळे वैभव कक्कर यांनी छायाचित्रांमध्ये टिपले आहे. 

गोव्याचे कला व संस्कृती खात्याचे सचिव दौलतराव हवालदार व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत यांच्या सोबत लोकमतच्या प्रतिनिधीने शनिवारी या प्रदर्शनाला भेट दिली व कक्कर यांच्याशी संवाद साधला. गोव्यातील ािस्ती धर्मियांच्या चर्चेस व हिंदू धर्मियांची मंदिरे म्हणजे मोठा खजिना असून पर्यटकांच्या मनात गोव्याची चांगली प्रतिमा ठसविण्यासाठी हा खजिना मदतरुप ठरेल, असे कक्कर म्हणाल्या.

टॅग्स :goaगोवा