शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील रायतळे येथे ट्रकने दुचाकीवरील दोन युवकांना चिरडले: दुपारी झाला अपघात

By सूरज.नाईकपवार | Updated: February 16, 2024 18:27 IST

जो ट्रक या अपघाताला कारणीभूत ठरला तो मयत तन्वेश याच्या काकाच्या मालकीचा होता.

मडगाव: गोव्यातील सासष्टी तालुक्यातील रायतळे कुडतरी येथे डांबर मिश्रीत खडी घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीवरील दोन युवकांना चिरडले. मयत सावर्डे भागातील आहेत. आज शुक्रवारी दुपारी अपघाताची ही भीषण घटना घडली. तन्वेश नाईक (२१, टोनीनगर, सावर्डे) व श्रीकर नाईक (१९, आनंदवाडी सावर्डे ) अशी मयतांची नावे असून,  ते एकमेकांचे जीवलग मित्र होते.  जो ट्रक या अपघाताला कारणीभूत ठरला तो मयत तन्वेश याच्या काकाच्या मालकीचा होता. मयत श्रीकर हा सावर्डे पंचायतीचे माजी पंच निळकंट नाईक यांचा मुलगा आहे. या दोन्ही युवकांच्या अपघाती मृत्यमुळे सावर्डे भागात शोककळा पसरली असून, सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

मायणा कुडतरी पोलिसांनी अपघाताच्या घटनेची माहिती मिळाल्यानतंर संबधीत ठिकाणी जाउन पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघाताची सांतोण सावर्डे येथिल हॉटमिक्स प्रकल्पातील डांबर मिश्रीत खडी घेउन एक ट्रक चांदर मार्गे मडगावात जात होता तर एमपीटीतील कोळसा घेउन अन्य एक ट्रक सावर्डेच्या दिशेने जात हाेता तर दुचाकीवालेही मडगावातून सावर्डेच्या दिशेने जात होते.

रालोय येथे अरुंद रस्त्यावर दोन्ही ट्रक समोरासमोर आले असता, कोळसावाहू ट्रकचे डिस्क डांबरची वाहतुक करणाऱ्या ट्रकच्या डिस्कला घासले. त्यामुळे त्या डांबरवाहू ट्रकच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व त्यांनी सरळ पुढून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. नंतर ट्रक सरळ शेतात कलंडला. ट्रकने दोन्ही युवकांना फरफटत नेले. या अपघाता ते दोघेही गंभीर जखमी होउन घटनास्थळी निपचित पडले होते. नंतर त्यांना येथील दक्षिण गोवा जिल्हास्तरीय इस्पितळात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवा