शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

हवालदारावर गाडी घालणाऱ्या दोघा संशयितांना अटक

By काशिराम म्हांबरे | Updated: October 1, 2023 19:36 IST

संशयित गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी आल्याची माहिती कळंगुट पोलिसांना उपलब्ध झाली होती.

काशीराम म्हांबरे, म्हापसा: ड्युटीवर असलेल्या कळंगुट पोलीस स्थानकावरील एका हवालदार विद्यानंद अमोणकर यांच्या अंगावर गाडी घालून त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. घडलेला प्रकार फिल्मी स्टाईलने करण्यात आला.सुंदीप कुमार ( वय २६, रा. बंगळूर, मूळ आंद्रप्रदेश) आणि वसंत मडीवाल (वय ३२, कारवार कर्नाटक ) अशी त्या संशयिताची नावे आहेत. सदर घटना शुक्रवारी रात्री घडली होती.

संशयित गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी आल्याची माहिती कळंगुट पोलिसांना उपलब्ध झाली होती. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आलेला. पोलीस आपल्या मागावर असल्याची चाहूल त्यांना लागली. हवालदार आमोणकर तसेच त्याचे सहकारी गाडीजवळ पोहचताच वसंत माडिवाल यांनी गाडीचा दरवाजा उघडून पळ काढला. तर गाडी चालवणारा संशयित संदीपकुमार याला पकडण्यासाठी आमोणकर गाडीजवळ गेले. त्याला पकडण्याच्या तयारीत आमोणकर असताना संदीपकुमार यांनी गाडी सुरु करुन मुद्दामहून गाडी  रिव्हर्समध्ये आमोणकरांच्या अंगावर घातली. गाडीची धडक बसताच आमोणकर गाडीखाली आले. तसेच त्यांना त्याच अवस्थेत त्यांना फरफटत नेण्यात आले. त्यानंतर त्यांनी घटना स्थळावरून गाडीतून पळ काढला. पोलिसांनी नंतर त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.

घडलेल्या प्रकारात हवालदार आमोणकर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला तसेच कमरेला जबर दुखापत झाली. त्यांना नंतर तातडीने उपचारासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेआहे. घटना कळंगुट परिसरातील गौरावाडो येथे घडली. पुढील तपास कार्य निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहे. 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी