शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
2
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
3
"मी काय मूर्ख नाही, भाजपचं मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
4
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
5
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा
6
निवडणूक निकालानंतर 'खेला होबे'..! INDIA आघाडीच्या बैठकीपासून ममता बॅनर्जी दूर का?
7
“राहुल गांधी ना सैन्यात भरती होऊ शकत, ना स्वतः काही कमावू शकत, आईवर ओझे”; भाजपाची टीका
8
प्रेमासाठी बदलला धर्म, शिफा झाली संध्या; कुटुंबीयांचा विरोध, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न
9
डेरा प्रमुख राम रहीमला मोठा दिलासा, माजी मॅनेजर रणजीत हत्येप्रकरणी हायकोर्टाने निर्दोष ठरवले
10
UPI पेमेंट्स आणि ई-कॉमर्समध्ये Adani एन्ट्रीच्या तयारी; Google, Paytm ला मिळणार टक्कर
11
तेरी गली में आया भूल के...! Ananya Pandey चा KKR च्या शिलेदारांसोबत डान्स, VIDEO
12
"नात्याचा विचार करू की...", 'मित्र' पटनायक यांच्यासोबत का होऊ शकली नाही युती? PM मोदी स्पष्टच बोलले
13
“लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही”; अजित पवारांचे विधान चर्चेत
14
Video - ट्यूमर सर्जरीनंतर राखी सावंतची झाली वाईट अवस्था; चालणंही झालं अवघड
15
प्रशांत किशोर यांचे 'हे' ५ अंदाज ज्यानं भाजपाला दिलासा तर विरोधकांना धडकी भरली
16
मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले
17
उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप
18
Fact Check : "अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड
19
मराठमोळ्या अभिनेत्याचा कान्स फेस्टिव्हलमध्ये स्वॅग! साध्या पण रुबाबदार लूकने जिंकली मनं
20
'एलआयसी'ची मोठी तयारी! आता LIC देणार हेल्थ इन्शुरन्स; कंपनीने दिले संकेत

मोबोरनजीक साळ नदीत दोन ट्रॉलर बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 6:58 PM

नदीच्या मुखावर दुर्घटना : तीन खलाशांना जीवरक्षकांच्या सहाय्याने तडीवर आणले

मडगाव: मडगावपासून 17 कि.मी.अंतरावर असलेल्या मोबोरनजीक साळ नदीत केवळ दहा तासाच्या अवधीत दोन मच्छीमारी ट्रॉलर्स बुडण्याची घटना घडल्या असून एका ट्रॉलरातील तीन खलाशांना दृष्टीच्या जीवरक्षकांनी जेटस्कीच्या सहाय्याने तडीवर आणले. यापैकी एक घटना रविवारी रात्री तर दुसरी घटना सोमवारी दुपारी घडली.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीप्रमाणो, मोबोर समुद्रातून या होडय़ा साळ नदीत आत शिरताना मध्ये वाटेत असलेल्या रेतीच्या टेकडय़ांना त्या आपटल्याने त्यांचे इंजीन बंद होऊन त्या पाण्यात कलल्या. या दोन्ही बोटी बाहेर काढण्यासाठी तटरक्षक दलाकडून मदत घेतली गेली. मात्र सायंकाळर्पयत या बोटी नदीतून बाहेर काढता आल्या नव्हत्या.

कुटबण बोटमालक संघटनेचे अध्यक्ष रॉय बर्ाेटो यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मोबोर समुद्रातून या बोटी साळ नदीतील जेटीवर आणताना या दोन्ही दुर्घटना घडल्या. पाण्याच्या प्रवाहाने या नदीच्या मुखावर रेतीच्या टेकडय़ा निर्माण होतात. त्यामुळे बोटी नदीत आणण्यात अडथळे निर्माण होतात. सुकतीच्यावेळी ही अडचण जास्त सतावते. या दोन्ही दुर्घटना होण्यामागे या रेतीच्याच टेकडय़ा कारणीभूत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, बोटमालक संघटनेने सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मच्छीमारी होडय़ा सुखरुप नदीत आणण्यासाठी यापूर्वी सरकारने जो ब्रेक वॉटर्स प्रकल्प हाती घेतला होता तो त्वरित पूर्ण करावा अशी मागणी केली. या प्रकल्पामुळे पाण्याचा प्रवाह वाढून टेकडय़ा वाहून जातात आणि त्यामुळे होडय़ांना विनाव्यत्यय नदीत येणो शक्य होणार आहे. काही एनजीओंनी याला आक्षेप घेतल्यामुळे सध्या हे काम बंद पडले आहे. सरकारने आवश्यकता भासल्यास वाटाघाटी कराव्यात पण हा प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणी या संघटनेने केली. यावेळी रॉय बर्ाेटो यांच्यासह पेट्रीक डिसिल्वा व अँथनी रोड्रीगीस हे पदाधिकारी उपस्थित होते.

तिघांना आणले सुखरुप काठावरया दुर्घटनेत सापडलेल्या ट्रॉलरवर तांडेल विनोद उरंग व अशोक बारीक व पंकज बारीक असे अन्य दोन कामगार होते. ट्रॉलर पाण्यात कलंडल्याचे लक्षात आल्यानंतर दृष्टीचे जीवरक्षक सर्वेश गावकर व सुरज वेळीप यांनी जेटस्कीच्या सहाय्याने पाण्यात धाव घेत या तिघांनाही कडेवर आणले. बोटमालक संघटनेचे पदाधिकारी पेट्रीक डिसिल्वा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, ही दुर्घटना झाल्याचे समजल्यानंतर त्वरित किनारपट्टी पोलिसांना तसेच तटरक्षक दलाला सतर्क करण्यात आले. तटरक्षक दलाच्या सहाय्याने बुडलेली बोट बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते.