शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

श्री देव बोडगेश्वर मंदिर चोरी प्रकरणी दोघांना अटक; मंदिरातील पैशाची पेटी फोडली

By काशिराम म्हांबरे | Updated: February 28, 2024 14:28 IST

म्हापसा येथील प्रसिद्ध तसेच जागृत असे देवस्थान श्री देव बोडगेश्वर मंदिरात आज बुधवारी पहाटेच्या दरम्यान झालेल्या चोरीचा छडा अवघ्या तासात पोलिसांनी लावला आहे.

म्हापसा: काशिराम म्हांबरे

म्हापसा येथील प्रसिद्ध तसेच जागृत असे देवस्थान  श्री देव बोडगेश्वर मंदिरात आज बुधवारी पहाटेच्या दरम्यान झालेल्या चोरीचा छडा अवघ्या तासात पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणात दोघा संशयितांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या प्रांगणातील स्तंभावर ठेवलेली काचेची पादुका पेटी फोडून त्यातील रक्कम चोरली होती. संशयितांच्या अटकेनंतर पोलिसांनी चोरलेली रक्कमही चोरट्यांकडून ताब्यात घेतली  आहे.संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांना विशेष पथकाची स्थापना केली होती. त्यानंतर मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सागर शिंदे ( वय ४०, कर्नाटक ) तसेच आनंद एस नाईक ( वय ४० बेळगांव- कर्नाटक ) यांना अटक करण्यात आली.  

म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची घटना पहाटे ४.३० वाजण्याच्या अंदाजाला घडली होती. तेथील सुरक्षा रक्षक झोपला असता चोरीचा प्रकार घडलेला.  दोन चोरटे मंदिराच्या परिसरात शिरले. प्रांगणात  ठेवण्यात आलेल्या काचेच्या आच्छादनावर चोरट्यांनी दांडा हाणून  पेटी फोडली. पेटीवर दांडा हाणल्याने झालेल्या आवाजातून सुरक्षा रक्षकाला जाग आली.  त्यांने लगेच आरडा ओरड सुरु केला.  या गडबडीत चोरट्यांनी तेथे दांडा टाकून पळ  काढला. पळून जाताना  हाताला मिळतील तेवढ्या नोटा गोळा  करुन पलायन केलेहोते. घटनेची माहिती नंतर पोलिसांना देण्यात आलेली.  पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा नोंद केला होता.  

सुमारे महिनाभरापूर्वी देवाची जत्रा संपन्न झाली होती.  या संबंधी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी दिली. तपासासाठी पोलिसांनी देवस्थानच्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेजचा वापर केला होता.  पुढील तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.