खाणग्रस्त ट्रकमालकांचा काही महिन्यांपासून धुमसत असलेला असंतोष गेल्या आठ-दहा दिवसांपासून उफाळून येत आहे. आतापर्यंत एखाददुसरा अपवाद वगळता ट्रकमालकांच्या आंदोलनाने उद्रेकाची सीमा ओलांडली नसली तरी येत्या काही दिवसांत हे आंदोलन रौद्र रूप धारण करण्याची शक्यता खाणपट्ट्यात व्यक्त होत आहे. ट्रकमालकांच्या आंदोलनाबाबत राजकीय पातळीवरील अनास्थेमुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तीन वर्षे बंद असलेला खाण व्यवसाय थोड्याफार प्रमाणात का होईना पुन्हा सुरू होत असल्यामुळे खाण अवलंबितांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. मात्र, खाण व्यवसायाच्या नमनालाच खाण व्यवसायात पूर्वीपासून घुसलेल्या किडी वळवळण्यास सुरुवात झाल्याने भविष्यात खाण व्यवसाय विनाअडचण सुरू होईल की नाही, याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. सरकारने खाण व्यवसायाच्या सुरुवातीलाच या व्यवसायातील प्रमुख घटक असलेल्या ट्रकमालकांना दुखावण्याचे काम केले. मुळात तीन वर्षे हालअपेष्टा सोसलेल्या या खाण अवलंबितांना पर्यायाने ट्रकमालकांना थोडीफार सहानुभूती दाखवण्याची गरज होती. मात्र, तसे न करता खाण कंपन्यांचे चोचले पुरवण्यासाठी सरकार पातळीवरून ट्रकमालकांची फरपट चालली आहे. याची सरकारने वेळीच दखल घेण्याची गरजही व्यक्त होत आहे. ट्रकमालकांची खनिज वाहतुकीसाठी रास्त दर देण्याची मागणी आहे. सरकारने ई-लिलाव झालेल्या मालाच्या वाहतुकीसाठी ठरवलेला दर परवडत नसतानाही ट्रकमालकांनी मान्य केला होता. यामागे खाण व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा हीच अपेक्षा होती. मात्र, ई-लिलाव झालेला खनिज माल संपल्यानंतर नव्याने खाण उत्खनन करताना त्या मालाच्या वाहतुकीसाठी ट्रकमालक संघटनेने वेगळा दर मागितला होता. मात्र, खाण कंपन्या सरकार पातळीवरून ई-लिलावासाठी ठरलेल्या दरापेक्षाही कमी दरात वाहतूक करण्यासाठी ट्रकमालकांवर दबाव आणत आहेत. राजकीय आर्थिक स्वार्थापोटी सरकार खाण कंपन्यांपुढे नमते घेत असल्याचे ट्रकमालकांचे म्हणणे आहे. गेल्या निवडणुकांत विद्यमान भाजप सरकारने खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याच्या आश्वासनामुळे स्पष्ट बहुमत प्राप्त केले होते. भाजपचे खाणपट्ट्यातील चार आमदार जनतेने निवडून दिले होते. मात्र, सध्या या चारपैकी तीन आमदारांनी आपल्याला निवडून दिलेल्या जनतेकडे पाठ फिरवली असून येणाऱ्या २0१७च्या निवडणुकीत भाजपच्या या आमदारांना आपले वर्तन महागात पडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. आमदार डॉ. प्रमोद सावंत हेच काय ते ट्रकमालकांच्या बरोबर असून (पान २ वर)
ट्रकमालकांचे आंदोलन पेटणार
By admin | Updated: December 11, 2015 00:19 IST