शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळे तोडफोड प्रकरण : संशयित फ्रान्सिस्को निर्दोष, आरोप निश्चित करण्यासाठी पुराव्यांचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 19:36 IST

दीडशेच्या आसपास धार्मिक स्थळांची विटंबना केल्याच्या आरोपावरुन गोवा पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी अटक केलेल्या फ्रान्सिस्को परेरा उर्फ बॉय याला मडगावातील प्रथम वर्ग न्यायालयाने चार प्रकरणात आरोप निश्चितीपुर्वीच निर्दोष मुक्त केल्याने पोलिसांचा दावा फोल ठरला आहे. 

-  सुशांत कुंकळयेकर

मडगाव :  दीडशेच्या आसपास धार्मिक स्थळांची विटंबना केल्याच्या आरोपावरुन गोवा पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी अटक केलेल्या फ्रान्सिस्को परेरा उर्फ बॉय याला मडगावातील प्रथम वर्ग न्यायालयाने चार प्रकरणात आरोप निश्चितीपुर्वीच निर्दोष मुक्त केल्याने पोलिसांचा दावा फोल ठरला आहे.  मे ते जुलै या दरम्यान दक्षिण गोव्यात पाठोपाठ धार्मिक स्थळांची मोडतोड सुरु होती. त्यामुळे धार्मिक भावनाही उचंबळून आल्या होत्या. अशा परिस्थितीत मडगावपासून 22 कि.मी. अंतरावर असलेल्या कुडचडे येथील टॅक्सी ड्रायव्हर फ्रान्सिस्को याला जुलै महिन्यात कुडचडे पोलिसांनी अटक केली होती. कुडचडे येथील दफनभूमीतील सुमारे 100 क्रॉसची मोडतोड केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने मागच्या दहा वर्षात दीडशेच्या आसपास धार्मिक स्थळांची आपण मोडतोड केल्याची कबुली पोलिसांना दिली होती.मात्र,  या दीडशेपैकी ज्या चार प्रकरणात पोलिसांनी बॉयच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्या चारही प्रकरणातून आरोप निश्चितीपूर्वीच त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले. या चार प्रकरणातील तीन प्रकरणे रस्त्याच्या बाजूला असलेल्या क्रॉसांच्या मोडतोडीची असून चौथे प्रकरण 2009 साली वेरोडा-कुंकळ्ळी येथील प्रसिद्ध सात देवळांच्या मोडतोडीचे आहे.  या प्रकरणात 2 जुलै 2017 रोजी पर्वत पारोडा येथे असलेल्या वालंकिणी सायबिणीच्या क्रॉसच्या तसेच त्याच दिवशी चांदर येथील आल्मा खुरीसच्या प्रकरणाचा समावेश आहे. प्रथमवर्ग न्यायाधीश अनुराधा आंद्राद यांनी सदर संशयिताला तीन प्रकरणातून तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुजा सरदेसाई यांनी एका प्रकरणातून त्याला निर्दोष मुक्त केले. या चार प्रकरणात संशयिताच्यावतीने अॅड अंजू शंकर आमोणकर व अॅड. एरीक कुतिन्हो यांनी काम पाहिले.सात देवळांच्या मोडतोडीसंदर्भात युक्तीवाद करताना अॅड. कुतिन्हो यांनी याच प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी अन्य दोघांना अटक केली होती. याकडे लक्ष वेधताना या प्रकरणात कुठलाही पुरावा नसताना फ्रान्सिस्कोला त्यात गुंतविण्यात आल्याचा दावा केला. तर अॅड. आमोणकर यांनी पोलिसांचा दावा केवळ संशयिताने दिलेल्या जबानीवर आधारित आहे. मात्र संशयिताने दिलेली जबानी पुरावा म्हणून ग्राह्य धरत नाही. या प्रकरणात कुणीही प्रत्यक्ष साक्षीदार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय