शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

उपद्रवी प्राण्यांवर येणार संक्रांत!

By admin | Updated: January 14, 2016 03:04 IST

पणजी : शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणारे काही वन्यप्राणी हे उपद्रवी प्राणी म्हणून जाहीर करण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत

पणजी : शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणारे काही वन्यप्राणी हे उपद्रवी प्राणी म्हणून जाहीर करण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. माकड, डुक्कर अशा काही प्राण्यांविषयी तसा विचार सुरू असल्याचे पार्सेकर यांनी सूचित केले. सगळ्याच गोष्टी सभागृहात खुलेआम बोलता येत नाहीत. मात्र, माझी वन खात्याशी चर्चा सुरू आहे. काही प्राणी शेतकऱ्यांना खूप त्रास देतात, हा विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांचा उल्लेख बरोबर आहे. काही प्राण्यांना उपद्रवी प्राणी म्हणून जाहीर करण्याची आता वेळ आलीच आहे. आम्ही त्यासाठी पावले उचलत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राणे यांनी सत्तरीतील वाढत्या माकडतापाच्या रुग्णांविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. माकडे, खेती, गवे, रानटी डुक्कर यांच्याकडून शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त केली जात आहेत. शेतकरी त्यामुळे अस्वस्थ आहेत, असा मुद्दा राणे यांनी मांडला. काही राज्यांनी डुक्कर, माकडे वगैरे उपद्रवी प्राणी म्हणून जाहीर केले आहेत. आफ्रिकेत तर हत्तींचीदेखील हत्या करण्यास मान्यता आहे. अन्य राज्यांप्रमाणे गोवा सरकारही पावले का उचलत नाही, अशी विचारणा राणे यांनी केली होती. माकडतापाविषयी बोलताना राणे यांनी, उपाययोजना करण्याबाबत आरोग्य खाते कमी पडते, असा मुद्दा मांडला. आतापर्यंत माकडतापाचे सत्तरी तालुक्यात ३० रुग्ण सापडले. त्याविरुद्ध मुळापासूनच उपाययोजना करायला हवी. आरोग्य खाते लोकांना पांढरे कपडे घालण्याची सूचना करते. या सूचना ‘नॉन प्रॅक्टिकल’ आहेत, असे राणे म्हणाले. (खास प्रतिनिधी)