शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण अंतर्गत राज्यातील २२,३२४ लोकांशी आदिवासी खात्याने साधला संपर्क : संचालक दशरथ रेडकर

By समीर नाईक | Updated: March 15, 2024 15:45 IST

राज्यातील आदिवासी खात्यातर्फे आदिवासी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि दिशा फाऊंडेशन यांच्या सहाय्याने आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण सुरूकेले आहे.

पणजी: राज्यातील आदिवासी खात्यातर्फे आदिवासी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि दिशा फाऊंडेशन यांच्या सहाय्याने आदिवासी उपजीविका स्थलांतर सर्वेक्षण सुरूकेले आहे. २०२३ मध्ये हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत ५५८१ घरातील मिळून सुमारे २२,३२४ लोकांपर्यंत आम्ही संपर्क साधला आहे. आदिवासी समाजातील लोकांच्या नेमक्या समस्या जाणून घेणे, व त्यांचे समाधान  करणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य हेतू आहे, अशी माहिती आदिवासी खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांनी दिली.

पणजीत शुक्रवारी आयोजीत पत्रकार परिषदेत आदिवासी खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी रिसर्च इन्स्टिट्यूचे संचालक राजेंद्र मिरजकर, व दिशा फाऊंडेशनच्या डॉ. अंजली बोहराडे उपस्थित होत्या.

आदिवासी समाजातील लोक नेहमीच उपजीविकेसाठी स्थलांतर होत असतात. अनेकजण गावातून शहरांकडे स्थलांतर होत असतात. यांचे नेमके कारण काय? हे जाणून घेण्यासाठी सदर सर्वेक्षण आवश्यक आहे. या सर्वेक्षणच्या माध्यमातून आदिवासी समाजातील समस्यांचे निरसन आम्ही करण्यावर भर देणार आहोत. तसेच उपजिविकेसाठी त्यांना जे आवश्यक आहे, ते त्यांना गावातच उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे रेडकर यांनी यावेळी सांगितले.

या सर्वेक्षणच्या माध्यमातून एसटी समाजातील लोकांसाठी ज्या काही सरकारी योजना अस्तित्वात आहे, ते देखील त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात येईल. त्यामुळे आदिवासी समाजातील युवकांनी या सर्वेक्षणात सहभागी होत, समजाच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहनही रेडकर यांनी केले 

 पैशांचे ९० टक्के उपयोग 

आदिवासी समाज खात्याला जो बजेट सरकारतर्फे देण्यात आला आहे, त्यापैकी ९० टक्के पैसे आम्ही लोकांसाठी खर्च करत असतो. तसेच आमच्याशी सलग्न असलेल्या अनेक विभागातून नियमित बैठक घेत पैसे योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी खर्च होते की नाही याचाही आढावा घेतला जातो. योजनांबाबत देखील जागृती कार्यक्रम आयोजित करत असतो, असेही रेडकर यांनी यावेळी सांगितले.