शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

भारताचा पश्चिम किनारा डॉप्लर रडारच्या टापूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 21:58 IST

वादळ व पावसाची आगामी सूचना देणाऱ्या हवामान खात्याच्या डॉप्लर रडारचे केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचीव डॉ. ए. राजीवन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

पणजी: वादळ व पावसाची आगामी सूचना देणाऱ्या हवामान खात्याच्या डॉप्लर रडारचे केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचीव डॉ. ए. राजीवन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या रडारच्या उद्घाटनामुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टी डॉप्लर रडारच्या शृंखलांनी व्यापल्यामुळे पूर्णपणे रडारच्या टापूत आली आहे.प्रत्येक दहा मिनिटांत हवामान विषयक माहिती देणारे डॉप्लर रडारचे अधिकृतरीत्या उद्घाटन करण्यात आले. ए. राजीवन यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भारतीय हवामान खात्याचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश, हवामान खात्याच्या गोवा केंद्राचे संचालक एम. एल. साहू व इतर अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी मुंबई, कोची आणि तिरुअनंतपुरम या ठिकाणी डॉप्लर रडार कार्यान्वित करण्यात आली होती. मुंबई आणि कोची येथील रडारमध्ये बरेच अंतर असल्यामुळे बराचसा भाग हा रडारच्या कक्षेत येत नव्हता. आता गोव्याच्या समावेशाने पूर्ण पश्चिम किनारपट्टी डॉप्लर रडारच्या टापूत आली आहे. या रडारच्या लोकार्पणामुळे चक्रिवादळ अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तींची लोकांना आगावू माहिती मिळणार आहे. २ किलोमीटर अंतरापर्यंतच्या कक्षेतील हवामानाचा वेध हे रडार घेऊ शकते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.आणखी किमान दहा डॉप्लर रडारे देशात विविध ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी राजीवन यांनी दिली. वास्तविक ९ वर्षां पूर्वीच हे डॉप्लर कार्यान्वित करण्यात येणार होते. परंतु ते चिनी बनावटीचे असल्यामुळे संरक्षणमंत्रालयाने त्याला सुरक्षेच्या कारणास्तव आक्षेप घेतला होता. संरक्षण मंत्रालयाची परवानगी मिळायला बरीच वर्षे जावी लागली. वास्तविक हे रडार यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आले होते. त्याद्वारे मिळालेली माहितीही वेबसाईटवर दिली जात होती. आता त्याची अधिकृतपणे घोषणा तेवढी झाली आहे.संपूर्ण गोवा डॉप्लरच्या कक्षेतडॉप्लरची कक्षा ही तशी ३०० किलोमीटरपासून अधिक आहे, परंतु २५०च्या त्रिज्येपर्यंतचा अंतरावरील वा-याच्या गतीचा वेध ते अचूक घेऊ शकते. तसेच १५० किलोमीटरपर्यंत त्रिज्येच्या कक्षेतील ढगांची छायाचित्रे टीपण्याची क्षमता त्यात आहे. गोव्याची लांबीच आहे अवघी ११० किमी एवढी. त्यामुळे आल्तिनो पणजी इथे कार्यान्वित केलेल्या या डॉप्लर रडारच्या केवळ ८० किलोमीटर त्रिज्येच्या कक्षेतच संपूर्ण गोवा व्यापला जात आहे. त्यामुळे गोव्यातील आभाळात कुठेही ढगांची दाटी किंवा हवेतील प्रवाहात झालेले बदल अचूकपणे या रडारला टिपता येणार आहेत.

टॅग्स :goaगोवा