शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात वरिष्ठ श्रेणी अधिका-यांच्या बदल्या, अजित पंचवाडकर नवे पंचायत संचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 18:22 IST

गोव्यात प्रशासनातील १७ ज्येष्ठ श्रेणी अधिका-यांच्या बदल्यांचा आदेश सोमवारी कार्मिक खात्याने काढला. अजित पंचवाडकर हे नवे पंचायत संचालक आहेत. तर मच्छिमारी खात्याच्या संचालकपदी विनेश आर्लेकर यांना आणण्यात आले आहे. 

पणजी : गोव्यात प्रशासनातील १७ ज्येष्ठ श्रेणी अधिका-यांच्या बदल्यांचा आदेश सोमवारी कार्मिक खात्याने काढला. अजित पंचवाडकर हे नवे पंचायत संचालक आहेत. तर मच्छिमारी खात्याच्या संचालकपदी विनेश आर्लेकर यांना आणण्यात आले आहे. 

दामोदर शंके यांना छपाई व मुद्रण संचालकपदी, नारायण प्रभुदेसाई यांची सिव्हिल डिफेन्स उपनियंत्रकपदी, श्यामसुंदर परब यांची मध्यवर्ती कारागृह अधिक्षकपदी, विजय परांजपे यांची शिष्टाचार खात्यात अतिरिक्त सचिवपदी, रुही रमेश रेडकर यांची  बांधकाम खात्यात प्रशासन संचालकपदी, दीपाली नाईक यांची महिला व बाल कल्याण खात्यात संयुक्त संचालकपदी, संध्या कामत यांची गोवा अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळावर व्यवस्थापकीय संचालकपदी, श्रीमती लावरा ब्रिटो इ माद्रे दे देऊस यांची राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणावर सचिवपदी, राजन सातार्डेकर यांची हस्तकला महामंडळावर व्यवस्थापकीय संचालकपदी, आशुतोष आपटे यांजे राज्य निबंधकपदी, स्नेहा मोरजकर यांची राजभाषा संचालनालयात संचालकपदी, सुरेंद्र नाईक यांची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ या पदी, उमेशचंद्र जोशी यांची जलस्रोत खात्यात प्रशासन संचालकपदी, सिध्दी हळर्णकर यांची पंचायत खात्यात अतिरिक्त संचालकपदी तर श्रीमती शर्मिला झुझार्त यांची औद्योगिक विकास महामंडळात विशेष भूसंपादन अधिकारी या पदी बदली करण्यात आली आहे. 

स्नेहा मोजरकर यांच्याकडे कोकणी अकादमीच्या अध्यक्षपदाचा ताबा राहील तसेच मुख्य सचिवांच्या कार्यालयात संयुक्त सचिव म्हणूनही त्या काम पाहतील. छपाई व मुद्रण संचालक अरविंद लोलयेंकर यांना कार्मिक खात्यात संपर्क करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दीपाली नाईक यांच्याकडे कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या विशेष भूसंपादन अधिकारी या पदाचा अतिरिक्त ताबा राहील. श्यामसुंदर परब यांच्याकडे एनआरआय व्यवहार खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा राहील. 

उत्तर जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या पदाचा अतिरिक्त ताबा दशरथ रेडकर यांच्याकडे राहील. वरील सर्व अधिका-यांनी पुढील पाच दिवसांच्या आत नवीन पदाचा ताबा घ्यावा, असे आदेशात म्हटले आहे. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे वैद्यकीय उपचारानिमित्त अमेरिकेत आहेत. त्यांच्या संमतीनेच बदल्यांचा हा आदेश काढण्यात आल्याचे सांगण्यात येते. 

टॅग्स :goaगोवाTransferबदली