शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमविषयक अभ्यासक्रम : निखिल देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 13:58 IST

राज्यातील विद्यार्थ्यांना वाहतूकविषयक नियम कळावेत, त्यांच्यात त्याविषयी शिस्त यावी या हेतूने वाहतूक खात्याने शिक्षण खात्याकडून अभ्यासक्रम तयार करून घेतला आहे.

पणजी : राज्यातील विद्यार्थ्यांना वाहतूकविषयक नियम कळावेत, त्यांच्यात त्याविषयी शिस्त यावी या हेतूने वाहतूक खात्याने शिक्षण खात्याकडून अभ्यासक्रम तयार करून घेतला आहे. यापुढे हा अभ्यासक्रम लागू होईल, असे सरकारच्या वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी जी वाहने वापरली जातात, त्या वाहनांमध्ये सुरक्षात्मक उपाय असायला हवेत. रिक्षा व अन्य तत्सम छोट्या वाहनांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी कोंबले जातात. अशा वाहनांविरुद्ध कारवाई केली जाईल. कारण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे धोक्याचे आहे. लवकरच पालक शिक्षक संघ आणि विद्यालयांची व्यवस्थापने यांची एकत्रित बैठक बोलवली जाईल, असेही देसाई यांनी सांगितले. वाहतूक खाते दहा नवे इंटरसेप्टर्स खरेदी करणार आहे. त्यासाठी निविदा जारी झाली असून पुढील दोन महिन्यांत दहा इंटरसेप्टर्स वाहतूक खात्याच्या ताफ्यात जमा होतील, असे संचालक देसाई म्हणाले.गोवा हे पर्यटन राज्य असून येथे रोज हजारो नवी वाहने येत असतात. गेल्या वर्षी वाहन अपघातांची संख्या जास्त होती, पण वाहतूक खात्याने केलेल्या विविध उपायांमुळे आता वाहन अपघातांची संख्या खूप घटली आहे, असे आकडेवारी दाखवून देते. रस्त्यांवर बळी जाणा-यांची संख्या कमी झाल्याचे दाखवून देण्यासाठी आपण काही आकडेवारीही जाहीर करू इच्छितो, असे देसाई म्हणाले. 2017 साली जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत गोव्यातील रस्त्यांवर एकूण 3917 वाहन अपघात झाले होते व त्यात एकूण 315 व्यक्तींचे बळी गले होते. यंदा याच कालावधीत म्हणजे जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत 3054 वाहन अपघात झाले व 187 व्यक्तींचे बळी गेले. गेल्यावर्षी एका ऑक्टोबर महिन्यात 337 वाहन अपघातांमध्ये 30 व्यक्ती ठार झाल्या होत्या. यंदा ऑक्टोबर महिन्यात 305 अपघात झाले व त्यात 14 बळी गेले. अर्थात अजूनही ब-याच उपाययोजना वाहतूक खाते करील, असे देसाई यांनी नमूद केले.