शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नाताळ सणाच्या दिवसात पर्यटकांच्या सोयीसाठी वाहतुकीचा आराखडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 17:11 IST

नाताळ तसेच नवीन वर्षानिमित्त उत्तर गोव्यातील कळंगुट भागात येणा-या पर्यटकांना सोयीस्कर ठरावे, त्यांच्या वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी कळंगुट येथील किनारी भागासाठी वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

म्हापसा : नाताळ तसेच नवीन वर्षानिमित्त उत्तर गोव्यातील कळंगुट भागात येणा-या पर्यटकांना सोयीस्कर ठरावे, त्यांच्या वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी कळंगुट येथील किनारी भागासाठी वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नाताळ तसेच नवीन वर्षानिमित्त गोव्यात खास करुन कळंगुट किनारी भागात लाखोंच्या संख्येने दर वर्षी पर्यटक दाखल होत असतात. येणा-या पर्यटकातील बहुतेक पर्यटक हे देशी असल्याने स्वत:च्या वाहनातून येण्यावर भर देत असतात. त्यामुळे या दिवसात वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होवून जाते. स्थानिकांना त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. वाढत्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कळंगुट पंचायतीचे सरपंच शॉन मार्टीन्स यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीला कळंगुट पोलीस स्थानकातील वाहतूक निरीक्षक नारायण चिमुलकर, पंचायतीचे इतर पंचसदस्य व संबंधीत उपस्थित होते. सदरच्या बैठकीत नाताळ व नवीन वर्षासाठीचा वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती मार्टीन्स तसेच चिमुलकर यांनी दिली. त्यानुसार कळंगुट परिसरात अनेक ठिकाणी पार्किंगच्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. कळंगुटच्या नाक्यावर असलेल्या सेंट अ‍ॅलेक्स चर्चनंतर अवजड वाहनांना कळंगुट भागात प्रवेश दिला जाणार नाही. अनेक रस्ते एकेरी मार्ग करण्यात येणार आहेत तर रस्त्यावर वाहने पार्क केल्याने होणारी अडचण दूर करण्यासाठी पार्किंगवर बंदी लागू करण्यात येणार आहे. पंचायत क्षेत्रातील अनेक भागात तात्पूरती पार्किंगची सोय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मार्टीन्स यांनी दिली. पर्यटकांना घेवून येणा-या बसेसना सेंट अ‍ॅलेक्स चर्चजवळ पार्किंगचा तळ उभारुन देण्यात येणार असल्याची माहिती चिमुलकर यांनी दिली. तसेच मध्यम वाहनांना बागा परिसरात उपलब्ध असलेल्या जागेत पार्किंगची सोय करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. काही रस्ते बंद करण्यात येणार असून बंद असलेल्या रस्त्यावरुन फक्त स्थानिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. नाताळ सणाला ब-याच दिवसांचा अवधी असला तरी पर्यटकांची गैरसोय होवू नये यासाठी पूर्व तयारी करण्याचा तो एक भाग असल्याचे चिमुलकर म्हणाले. बैठकीत घेतलेले निर्णय तसेच तयार करण्यात आलेला आराखडा अधिसूचित करण्यासाठी उत्तर गोवाच्या जिल्हाधिका-यांना पाठवण्यात येणार आहे. सदर आराखडा २० डिसेंबरनंतर अमंलात येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :goaगोवाChristmasनाताळ