शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

म्हापशातील भाडेवाढीविरोधात व्यापाऱ्यांचे आंदोलन

By काशिराम म्हांबरे | Updated: January 18, 2024 16:30 IST

- तोडगा काढण्याचे आमदाराचे आश्वासन .

काशिराम म्हांबरे, म्हापसा: येथील नगरपालिका मंडळाने  बाजारपेठेतील दुकानांची केलेल्या भाडेवाढीवर नाराज झालेल्या म्हापसा व्यापारी संघटनेकडून निशेध व्यक्त करीत पालिकेवर धडक मोर्चा काढला. तसेच पालिकेत ठिय्या आंदोलन केले. केलेल्या आंदोलनाची दाखल घेऊन स्थानिक आमदार उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी आज संध्याकाळी पालिका मंडळाची बैठक घेऊन भाडेवाढिवर तोडगा काढण्याचेआश्वासन त्यांना दिले. दिलेल्या आश्वासनानंतर व्यापाऱ्यांकडून आंदोलन तात्पुर्ते मागे घेण्यात आले.

२९ डिसेंबर रोजी मंडळाच्या झालेल्या सर्वसाधारण बैठकित साबांखाच्या दरानुसार भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. यानुसार सरासरी १०० टक्के अर्थात १५२ चौरस मिटर वरून २९६ चौरस मिटर भाडे वाढ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. वाढिचा विरोध करुन आरंभी संघटनेकडून नगराध्यक्षांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर आमदारांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन सादर करण्यात आलेले पण त्यांच्याकडून  देण्यात आलेल्या आश्वासनांची पुर्तता होत नसल्यानेसंतप्त व्यापाऱ्यांनी आज गुरुवारी पालिकेवर धडक मोर्चा काढला होता. सुमारे ३०० हून अधिक व्यापारी त्यात सहभागी झाले होते.

आज सकाळी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी श्रीपाद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बाजारात एकत्रीत येवून त्यांनी प्रथम बाजारपेठ बंद ठेवली नंतर सर्वांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला. यावेळी व्यापाऱ्यांनी पालिकेत आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच नगराध्यक्ष आणि आमदारांच्या भेटीची मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास उद्या शुक्रवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला होता.

आंदोलनाची माहिती उपलब्ध होताच आमदार जोशुआ डिसोझा तसेच नगराध्यक्षा प्रिया मिशाळ काही तासानंतर पालिकेत दाखल झाले. आमदारांनी नगराध्यक्ष तसेच इतर नगरसेवकांच्या उपस्थितीत व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन यावर चर्चा केली. चर्चेनंतर या विषयावर आज सायंकाळी पालिका मंडळासोबत पुन्हा चर्चाकरुन तोडगा काढण्याचे आश्वासन आमदारांनी व्यापाºयांना दिले. दिलेल्या आश्वासनानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन तात्पुर्ते मागे घेतले पण योग्य तोडगा न निघाल्यास आंदोलन उग्र करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला.

टॅग्स :goaगोवा