शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

बफर झोनमध्ये पर्यटन प्रकल्प!

By admin | Updated: October 10, 2015 01:05 IST

पणजी : राज्यातील बफर झोनमध्ये म्हणजेच पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात इको टुरिझम व कृषी आधारित प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली जाणार आहे.

पणजी : राज्यातील बफर झोनमध्ये म्हणजेच पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात इको टुरिझम व कृषी आधारित प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली जाणार आहे. त्यासाठी नगर नियोजन कायद्यात दुरुस्ती करणारा वटहुकूम जारी करण्याचा निर्णय पार्सेकर मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सविस्तर माहिती दिली. राज्यात पर्यटन वाढत आहे. त्यादृष्टीने नवनव्या सुविधाही आम्ही उभ्या करत आहोत. स्थानिक लोकांना त्यातून रोजगार संधी प्राप्त व्हावी असा हेतू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यासाठीच अभयारण्ये व अन्य ठिकाणी जे बफर झोन आहेत, त्या झोनमध्ये तंबू, रेस्टॉरंट्स व अन्य पर्यटन प्रकल्प व कृषी आधारित प्रकल्प उभे करता येतील. त्यासाठी बझर झोनमध्ये ज्या व्यक्तीचे किमान २० हजार चौरस मीटरचे क्षेत्रफळ असेल, त्या व्यक्तीला इच्छा असल्यास त्या वीस हजार चौरस मीटरपैकी पाच टक्के जागा या प्रकल्पांसाठी वापरण्यास दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नगर नियोजन कायद्यात यासाठी दुरुस्तीची गरज होती. शुक्रवारी जारी केलेला वटहुकूम मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे. २०१५-१६च्या अर्थसंकल्पात सरकारने या विषयीचे आश्वासन दिले होते, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अग्निशमन सेवा संचालनालयात संगीत ब्रास बॅण्ड विभाग स्थापन केला जाईल. विविध सोहळ्यांसाठी त्याचा उपयोग होईल. त्यासाठी मंत्रिमंडळाने १८ कर्मचाऱ्यांची भरती मंजूर केली. पोलिसांचा वायरलेस विभाग बळकट केला जाईल. त्यासाठी या विभागात पोलीस उपनिरीक्षक पदापासून अन्य विविध प्रकारची ३८ पदे भरली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)