शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील किनारे पाण्याखालीच, दक्षिण व उत्तर गोव्याला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 17:10 IST

लुबान वादळाच्या तडाख्यातून अजूनही गोव्याची किनारपट्टी प्रभावित असून गुरुवारी (11 ऑक्टोबर) दुपारी पुन्हा एकदा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण आणि उत्तर गोव्यातील किनारे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत होते.

मडगाव - लुबान वादळाच्या तडाख्यातून अजूनही गोव्याची किनारपट्टी प्रभावित असून गुरुवारी (11 ऑक्टोबर) दुपारी पुन्हा एकदा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण आणि उत्तर गोव्यातील किनारे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत होते. बुधवारपेक्षा गुरुवारी अधिक पाणी किना-यावर आल्याने या किनारपट्टीवरील शॅक पुन्हा एकदा पाण्याखाली गेले. दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली, माजोर्डा, उतोर्डा, काणकोण तर उत्तर गोव्यात कांदोळी, कळंगूट, सिकेरी, वागातोर, अंजुणा, मोरजी आणि हरमल या किना-यावर पाणी वाढलेले दिसत होते. पाणी वाढल्यामुळे शॅक उभारणीचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून जोपर्यंत पाणी उतरत नाही तोर्पयत हे काम सुरु करता येणे कठीण अशी परिस्थिती झाली आहे. आपली अधिक नुकसानी होऊ नये यासाठी बहुतेक शॅकवाल्यांनी बुधवारी रात्रीच आपले सामान प्रभावीत क्षेत्रपासून दूर नेल्याने गुरुवारी शॅकवाल्यांना फारसे नुकसान झालेले नाही अशी माहिती खासगी शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कादरेज यांनी दिली.

कोलवा किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकांसाठी बांधलेला मनोराही पाण्याखाली गेला होता. पर्यटकांनी या खवळलेल्या समुद्रात उतरु नये यासाठी किना-यावर लाल धोक्याचे झेंडे ठिकठिकाणी लावल्याचे दिसत होते.मागच्या वर्षी आलेल्या ओखी वादळाने गोव्यातील शॅक मालकांचे कंबरडे मोडले होते. त्या वादळात शॅकवाल्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. हे नुकसान यावेळी भरुन काढण्याच्या इराद्याने गोव्यातील सर्व समुद्र किना-यावर शॅक उभारणीच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र हे काम चालू असतानाच लुबानचा फटका बसल्याने हे व्यावसायिक पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.कोलवा येथील एका व्यावसायिकाने सांगितले की, बुधवारी रात्री पाण्याची पातळी उतरु लागली होती. त्यामुळे आम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र गुरुवारी  दुपारी पुन्हा एकदा पाणी वाढले. ही वाढ बुधवारपेक्षा अधिक होती. येत्या दोन दिवसात परिस्थिती जाग्यावर येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे असेही या व्यावसायिकाने सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन