शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

उत्कर्षाचे विषय कीर्तनातून होतात स्पष्ट: सुभाष शिरोडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2024 08:18 IST

निवासी कीर्तन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : कीर्तन हा सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृतीच्या परंपरेतील एक भाग आहे. जीवनात कोणत्याही पैलूचे आणि समाजाच्या उत्कर्षाचे विषय हे कीर्तनातून मांडले जातात. कीर्तनातून संस्कार होतात, ते सर्वांनी आत्मसात केले पाहिजेत. गोव्यातील प्रसिद्ध कीर्तनकार सुहासबुवा वझे मागील अनेक वर्षांपासून समाजातील विविध बाल कीर्तनकारांना घडवण्याचे काम करत आहेत, असे उद्‌गार सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले.

चिकणगाळ शिरोडा येथील शांताप्रसाद अद्वैतानंद सभागृहात आयोजित केलेल्या ३३ व्या निवासी कीर्तन संस्कार शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात सुभाष शिरोडकर बोलत होते. हे शिबिर गोमंतक संत मंडळ, संचालित कीर्तन विद्यालय, फोंडा यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमात समाजसेवक जयंत मिरिंगकर, कीर्तनकार सुहासबुवा वझे, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, दीपा मिरिंगकर, संजय घाटे, रतनजी बेतकीकर, दामोदर कामत उपस्थित होते.

यावेळी जयंत मिरिंगकर म्हणाले, हिंदू एकता, हिंदू धर्म संस्कार देणाऱ्या कीर्तन शिबिराला माझे नेहमीच सहकार्य मिळेल. शांताप्रसाद अद्वैतानंद समाधी न्यास, अशा कामात नेहमीच पुढे आहे. यावेळी सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच गोव्यातील ज्येष्ठ संगीतकार रतनजी बेतकीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुहासबुवा वझे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा मिरिंगकर यांनी केले, तर आभार दामोदर कामत यांनी मानले.

 

टॅग्स :goaगोवा